PM Modi visit to Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फेट्यातील राजमुद्रा हटवली  प्राची कुलकर्णी
मुंबई/पुणे

PM Modi visit to Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फेट्यातील राजमुद्रा हटवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या शाही फेट्याला लावण्यात आलेली राजमुद्रा हटवण्यात आली

विश्वभूषण लिमये

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या शाही फेट्याला लावण्यात आलेली राजमुद्रा हटवण्यात आली आहे. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या राजमुद्रेवरून अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे शनिवारी या फेट्यावरून राजमुद्रा हटवून त्यावर सूर्यफूल लावण्यात आले आहे. यावरून कुठलेलंही राजकारण होऊ नये, यासाठी ही काळजी घेण्यात आली असल्याचे मुरुडकर फेटेवाल्यांकडून सांगण्यात आले आहे. (Prime Minister Narendra Modi hat Rajmudra removed)

हे देखील पहा-

मोदींसाठी बनवलेल्या फेट्यावरून कॉंग्रेसकडून चांगलाच वाद पेटला आहे. या फेट्यावर शिवरायांच्या 'राजमुद्रे'चा वापर करण्यात आला आहे. पुणे कॉंग्रेसकडून 'त्या' फेट्यावर आक्षेप घेतला जात आहे. मोदींना फेटा न घालण्याची कॉंग्रेसची यावेळी मागणी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे (Pune) महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण तसेच पुणे मेट्रोच्या वनाझ ते गरवारे या टप्प्याचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. सत्ताधारी भाजपकडून पुण्यात मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी पुण्यामधील गिरीश मुरुडकर झेंडेवाले यांनी आकर्षक राजबिंडा शाही फेटा तयार केला आहे. हा फेटा तयार करण्यासाठी ऑस्ट्रेलियन डायमंडचा वापर करण्यात आता आहे. फेट्यावर असणारे हिरे म्हणजेच आपली जनता आहे. या जनतेला घेऊन मोदी पुढे जाणार आहेत. या विचारातूनच आकर्षक राजबिंड्याची निर्मिती केली असल्याचे गिरीश मुरुडकर यांनी सांगितले होते.

पंतप्रधान मोदींच्या कपड्यांच्या विचार करुन आम्ही क्रीम विथ रेड कापडाचा वापर केला आहे. तर फेट्याच्या वरच्या बाजूला गोल्ड प्लेट लावली असून त्याला सोन्याचं पाणी दिलं असल्याचं गिरीश मुरुडकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. या शाही फेट्याच्या मध्यभागात मोत्याच्या सूर्यफुलात शिवमुद्रा बसविण्यात आली आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. यापार्श्वभूमीवर फेटा तयार करताना तो वजनाला हलका आणि डोक्याला जास्त गरम होणार नाही अशा पद्धतीने तयार करण्यता आला आहे. मोदींच्या स्वागतासाठी पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर शुभेच्छांचे बॅनरही लावण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

SCROLL FOR NEXT