PM Narendra Modi In Mumbai Saamtv
मुंबई/पुणे

PM Modi Mumbai:बंधु भगिनींना नमस्कार! मराठीतून सुरूवात ते मुंबईकरांना भावनिक साद; PM मोदींच्या भाषणातले ठळक मुद्दे

मराठीतून भाषणाची सुरूवात करत PM मोदींनी बीकेसी मैदानावरील भाषणात चौफेर फटकेबाजी केली.

Gangappa Pujari

Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. या दौऱ्यात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध योजनांचा शुभारंभ आणि भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान मुंबईत दाखल झाल्यानंतर बीकेसी मैदानावर त्यांची सभा झाली.

यावेळी पंतप्रधान मोदींनी शिंदे फडणवीस सरकारचे कौतुक करत येणाऱ्या काळात मुंबईचा कायापालट करु असा विश्वासही व्यक्त केला. (Narendra Modi Mumbai)

खास मराठीतून भाषणाला सुरूवात..

"माझ्या मुंबईतील बंधु आणि भगिनींना माझ्या नमस्कार," असे म्हणत बीकेसी मैदानावर सुरू असलेल्या सभेतील भाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास मराठीत सुरूवात केली. या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध घोषणा करताना महाविकास आघाडीवर जोरदार टीकाही केली.

मुंबईच्या विकासकामांचा वाचला पाढा..

आपल्या भाषणाच्या सुरूवातीला पंतप्रधानांनी मुंबईत केलेल्या कामाचा त्यांनी पाढा वाचला. "मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाची मेट्रो, छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या आधुनिकीकरण, रस्ते सुधारणेचा मोठा प्रकल्प, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने रुग्णालये, हे मुंबई शहर सुधारण्यात मोठी भूमिका बजावणार आहे," असे ते यावेळी म्हणाले.

डबल इंजिन सरकारमुळे विकास...

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे मुंबईचा मोठा विकास होत आहे. काही काळासाठी मुंबईच्या विकासाला ब्रेक लागला होता. मात्र शिंदे- फडणवीसांचे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा गती मिळाली आहे. त्याचबरोबर हे डबल इंजिन सरकार सर्व सामान्यांना सुविधा देत आहे, असे म्हणत शिंदे फडणवीसांचे कौतुक केले.

राजकीय स्वार्थासाठी विकासाला विरोध:

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाचे सरकार असो किंवा एनडीएचे सरकार असो कधीही विकासाच्या आड आले नाहीत. मात्र मुंबईमध्ये असे होताना दिसले. त्यामुळेच अनेक कामे रखडली गेली. असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी शिवसेनेवर केला.

मुंबईकरांना घातली साद...

त्याचबरोबर "आगामी बीएमसीच्या (Mumbai BMC) निवडणुकीत भाजपचं सरकार आल्यास विकास अधिक वेगान होईल. मुंबईचा विकास हवा असल्यास स्थानिक पातळीवर सत्ता हवी. विकासासाठी तुम्ही दहा पाऊले टाका मी अकरा पाऊले पुढे टाकेन," असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, या सभेनंतर विविध विकासकामांचा शुभारंभही मोदींच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनीही महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT