Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मुंबईत दाखल झाले आहेत. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. या दौऱ्यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास कामांचा उद्घाटनही होणार आहे.
यावेळी बीकेसी मैदानावर झालेल्या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.
काय म्हणाले फडणवीस...
मुंबईच्या बीकेसी मैदानावर सुरू असलेल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadanvis) उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदीजी, तुम्ही 2019 मध्ये सांगितलं होत पाच वर्षाच्या डबल इंजिन सरकार आणा. आपल्यावर विश्वास ठेवून देशातील नागरिकांनी डबल इंजिनचं सरकार आणलं."
"पण काही लोकांनी बेईमानी केली. त्यामुळे अडीच वर्ष जनतेच्या मनाचं सरकार बनू शकले नाही. पण बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी एकनाथ शिंदे यांनी धाडस केलं आणि आपल्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेच्या मनातलं सरकार इथे तयार झालं."
दरम्यान, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा दौरा हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महत्वाचा मानला जात आहे. यामुळे बीकेसीत नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या भाषणातून मोदी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोदी यांच्या सभेसाठी शिंदे गट व भाजपने जोरदार तयारी सुरु केली. बीकेसी मैदानावर एक लाख कार्यकर्त्यांना आणले गेले. त्यासाठी अनेक जिल्ह्यातून खाजगी वाहनांनी कार्यकर्ते दाखल झाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.