Elections : "जेवढ्या निवडणुका होतायत, तिथे राष्ट्रवादीची भरभराट आणि शिवसेनेची फरफट होतेय"
Elections : "जेवढ्या निवडणुका होतायत, तिथे राष्ट्रवादीची भरभराट आणि शिवसेनेची फरफट होतेय" Saam TV
मुंबई/पुणे

Elections : "जेवढ्या निवडणुका होतायत, तिथे राष्ट्रवादीची भरभराट आणि शिवसेनेची फरफट होतेय"

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यातील नगरपंचायतींचे निकाल जाहीर होताच भाजपनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत घेतली यावेळी त्यांनी सेनेला सल्ला देत भाजपच नंबर एकचा पक्ष असल्याचे वक्तव्य केलं आहे. 'भाजप एक हाती निवडणूक लढवत असताना आणि, विरोधी पक्षात असताना देखील महाराष्ट्रतील जनतेने भाजपचे (BJP) सर्वात जास्त सदस्य निवडणून दिले आहेत. भाजपला एकहाती यश मिळत असताना अपवादात्मक जागा राखण्यात यश मिळाल असल्याचं दरेकर म्हणाले.

सिंधुदुर्गमध्ये राणेंनी गड राखला -

धनंजय मुंडे यांची देखील बीड मध्ये खूप पीछेहाट झाली आहे. सुरेश धस यांनी आष्टी पाटोदा ताब्यात ठेवलं आहे तर विश्वजित कदम (Viswajit Kadam) यांच्या ताब्यातील पंचायत देखील भाजपने ताब्यात घेतल्याचं प्रवीण दरेकरांनी (Pravin Darekar) सांगितलं. रजनी पाटील आणि काही ठिकाणी पराभवाला सामोरा जावं लागल असून राष्ट्रवादीच्या नेत्यांना काही ठिकाणी यश मिळवलंय, पण ते लोकांना खोटं सांगून यश मिळवलं असल्याची टीका त्यांनी राष्ट्रवादीवरती केली. तिकडे सिंधुदुर्गमध्ये राणेंनी गड राखला असून रायगडमध्ये देखील आपण चांगलं यश मिळवलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

हे देखील पहा -

शिवसेनेची फरफट -

दरम्यान चारही पक्षात भाजप सगळ्यात मोठा पक्ष राहील्याचं या निकालावरुन दिसत असून, शिवसेनेने (Shivsena) काय करायचं हा त्यांचा विषय आहे. मात्र भाजपसोबत राहून सेनेची वाढ होत होती. पण दोन वर्षात सत्तेत असूनही जेवढ्या निवडणुका होतायत, तिथे सेना मागे फेकली जातेय, सेना मागे जातेय. राष्ट्रवादीची भरभराट होतेय, शिवसेनेची फरफट होतेय .

दोन वर्षात जनतेने विश्वास दाखवला म्हणत असतील, तर मग नेत्यांना पराभव का स्विकारावा लागतोय याचा त्यांनी विचार करावा असा सल्ला त्यांनी सेनेला दिला आहे. तसंच जनतेच्या भरवश्यावरती आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. आमच्याही प्रमुख नेत्यांच्या ठिकाणी पीछेहाट झाली, हे मान्य करतो असही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs CSK: आज चेन्नई-पंजाब भिडणार! कोण मारणार बाजी? पाहा पिच रिपोर्ट अन् मॅच प्रेडिक्शन

Today's Marathi News Live : मोठी बातमी! नसीम खान यांना काँग्रेस पक्षाकडून पुन्हा स्टार प्रचारकची जबाबदारी

Pune Crime: विश्वासू नोकरानेच केला हात साफ! साथीदारांच्या मदतीने तब्बल २१ तोळे सोने लंपास; १२ तासात आरोपी अटकेत

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा खेळ बिघडणार? बंडखोरांनी वाढवलं टेन्शन, महायुतीत पुन्हा धुसफूस

Ghee Benefits : खा तूप येईल रुप; आरोग्यावर होणारे हे चमत्कारिक फायदे तुम्हाला माहितीच नसतील

SCROLL FOR NEXT