ST कर्मचाऱ्यांना दिलेला 'तो' शब्द पाळा; प्रविण दरेकरांचे शरद पवारांना आवाहन SaamTV
मुंबई/पुणे

ST कर्मचाऱ्यांना दिलेला 'तो' शब्द पाळा; प्रविण दरेकरांचे शरद पवारांना आवाहन

गेल्या अनेक वर्षापासुन ST कर्मचारी आपल्या हक्काच्या मागण्या मांडत असताना राष्ट्रवादी कॉग्रेसचे Sharad Pawar यांनी कामगारांच्या आदिवेशनात जाऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले होते.

रोहिदास गाडगे

पुणे : गेल्या अनेक वर्षापासुन ST कर्मचारी आपल्या हक्काच्या मागण्या मांडत असताना राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद Sharad Pawar पवारांनी कामगारांच्या आदिवेशनात जाऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले होते "आता तो दिलेला शब्द पाळा"आम्ही तुमचं अभिनंदन करु भाजपाचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकरांनी ST आंदोलनावर तोडगा काढण्याचे आवाहन शरद पवारांना केलं आहे. प्रविण दरेकर Pravin Darekar यांनी शिरुर येथील एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाला (ST workers' agitation) भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

हे देखील पहा -

आता हेच ST चे कर्मचारी आपल्या हक्काचा लढा घेऊन रस्त्यावर उतरलेत या कर्मचा-यांवर दडपण, निलंबन, पोलीसी बळाचा वापर करुन कर्मचा-यांचा संप दाबण्याचा प्रयत्न करु नका अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढणार असल्याचा इशाराच प्रविण दरेकरांनी राज्यसरकारला यावेळी दिला.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray , बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि एसटी कर्मचारी संघटनेचं शिष्टमंडळांने शरद पवारांची भेट घेतली असून सध्या सुरु असणारा ST कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप हेच या भेटीमागचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT