Nawab Malik/ Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

'मलिकांचा राजीनामा घ्यायचं ठाकरेंच्या मनात, मात्र राष्ट्रवादी पाठिंबा काढण्याची भिती?'

'नवाब मलिक साधुसंत असल्याप्रमाणे गांधींजींच्या पुतळ्यासमोर राज्य सरकारचे नेते आंदोलन करत आहेत. असं पुर्वी कधी झालं नव्हतं'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी -

पुणे : उद्धव ठाकरेंच्या मनात मलिकांचा राजीनामा घ्यायच असेल पण राष्ट्रवादीने पाठिंबा काढला तर काय ? या भितीने ते कारवाई करत नसावेत, असं वक्तव्य भाजपनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केलं ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले, 'नवाब मलिक (Nawab Malik) साधुसंत असल्याप्रमाणे गांधींजींच्या पुतळ्यासमोर राज्य सरकारचे नेते आंदोलन करत आहेत. असं पुर्वी कधी झालं नव्हतं, गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात भाजपने कारवाई केली नाही किंवा तक्रार केली नाही. ती तक्रार आयुक्तांची होती. आव्हांडांवर भाजपने तक्रार केली नाही. न्यायालयाचा आदेश होता'

दरेकरांनी बोलताना आघाडी सरकारवर अनेक आरोप केले, ते म्हणाले, 'संजय राठोड प्रकरणी केस दाबायला सत्तेचा गैरवापर झाला, नारायण राणेंवर गुन्हा दाखल केला पण संजय राऊत, नाना पटोलेंवर कारवाई केली नाही असही दरेकर म्हणाले.

नवाब हटाओ देश बचाओ

तसंच मलिकांचा राजीनामा घेण्याचा ठाकरी बाणा बाळासाहेबांचे सुपुत्र दाखवत नाहीयेत. त्यांच्या मनातही असेल पण राष्ट्रवादीने पाठिंबा काढला तर काय ? या भितीने ते कारवाई करत नसावेत. अशी टीकाही त्यांनी यावेळी शिवसेनेवर केली. नवाब हटाओ देश बचाओ असा संवाद यात्रा भाजप करणार असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान,जे भाजपमध्ये (BJP) आलेत ज्यांच्यावर आरोप होत आहेत मात्र त्यांच्यावर कारवाई करायला सत्ताधाऱ्यांना कोणी थांबावलंय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. रश्मी शुक्ला प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) गृहमंत्री आहेत मात्र शुक्लांवरील आरोप सिद्ध झाले नाहीच ते होतील तेंव्हा कारवाई करावी. या कारवाईला सुडभावनेने कारवाई करताय असा आरोप केला तर असा सवाल करत, सरकारने सामान्य लोकांचे प्रश्न सुडवण्यासाठी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी बंद होणं अपेक्षित आहे. पण सत्ताधारी नेत्यांना वाचवायला आंदोलन करत असल्याचही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT