#परीक्षांचाधंदाथांबवा: सरकारने एकत्रीत केलेला महाघोटाळा- प्रवीण दरेकर Saam Tv
मुंबई/पुणे

#परीक्षांचाधंदाथांबवा: सरकारने एकत्रीत केलेला महाघोटाळा- प्रवीण दरेकर

आरोग्य विभागाने रद्द केलेल्या परीक्षांची विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी पोलखोल केली आहे.

वैदेही काणेकर, सामटीव्ही, मुंबई

मुंबई: आरोग्य विभागाने रद्द केलेल्या परीक्षांची विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी पोलखोल केली आहे. ब्लॅक लिस्ट न्यास कंपणीबाबत त्यांनी कागदपत्र वाचून दाखवले आहे. ते म्हणाले अधिवेशनाच्या वेळी अजीत पवार म्हणाले होते, आरोग्या विभागाच्या परीक्षा MPSC च्या अंडर घेतल्या जातील, परंतु त्याची कुठलिही अंमलबजावणी दिसत नाहीये. ज्या कंपन्या ब्लॅक लिस्टेड होत्या त्यांना काम देवून सरकारने मोठा घोळ केलेला आहे. न्यास ला आयत्यावेळी आणलं जेणेकरून ८ ते १० वेळा शुद्धीपत्र काढून हिच कंपनी बसावी म्हणून निवडचीचे निकष बदलण्यात आले. एखाद्या कंपनीला काम देताना त्या कंपनीकडे अनुभव, प्रमाणपत्र सगळं असायला हवं अशी त्यांनी अट ठेवलेली आहे.

आरोग्या विभागाच्या परीक्षांबाबत जो गोंधळ झाला आहे, त्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी दरेकरांना केली आहे. विद्यार्थ्यांना जो मानस्ताप झाला त्याचा खर्च सरकारने द्यावा त्याच बरोबर खर्चाची जबाबदारी सरकारने घ्यावी अशी मागणी दरेकरांनी केली आहे. सरकारने एकत्रित केलेला हा महाघोटाळा आहे. नाना पटोले (Nana Patole) यांनीही महाघोटाळा असल्याचा आरोप केला आहे. या बाबत CBI, CID, निवृत्त न्यायधीशांमार्फत चौकशीची मागणी दरेकरांनी केली आहे. बाजारामध्ये काही दलाल फिरत होते, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी विनंती करतो आणि जर सरकारने कारवाई नाही केली तर विद्यार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दरेकरांनी दिला आहे. सरकारला संतापाची आणि दिलेल्या आश्वासनाचं काही पडलेलं नाही. कोणत्याही कंपनीला पकडा त्याकडून पैसे घ्या असं सध्या चाललं आहे, असे गंभीर आरोप दरेकरांनी केले आहेत.

त्याचबरोबर दरेकर पुढे म्हणाले अनेक दलाल बाजारात फिरत आहेत. काही विद्यार्थ्यांना सांगितलं की पेपर कोरे सोडा अशी माहिती आमच्याकडे आली आहे. फाईल गायब करण्याचा काम सुरू आहे. कोणी कंपनीची माहिती देत नाही सर्व जण हात वर करत आहे. एकमेकांकडे बोट दाखवले जात आहे अशा प्रकारची टीका दरेकरांनी केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT