नाना पटोलेंची वक्तव्ये ही राजकारणाला काळीमा फासणारी - प्रवीण दरेकर Saam TV
मुंबई/पुणे

नाना पटोलेंची वक्तव्ये ही राजकारणाला काळीमा फासणारी - प्रवीण दरेकर

'नाना पटोले हे राजकारणातले असंस्कृत नेतृत्व आहे. कधी काळी काँग्रेसची (Congress) वैभवशाली परंपरा होती, सुसंस्कृतपणा होता परंतु पटोले यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये त्या पदाची गरिमा घालवली.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : नाना पटोले (Nana Patole) आणि त्यांच्या पक्षाची नौटंकी सुरू आहे. सत्तेमध्ये मांडीला मांडी लावून बसायचे आणि विचारधारेला विरोध केल्यानंतर मूग गिळून बसायचे अशा प्रकारची नौटंकी महाराष्ट्रातील जनता जाणते, अशी घणाघाती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ((Pravin Darekar) यांनी नाना पटोले यांच्यावर केला.

प्रवीण दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सत्तेत एकत्र राहायचे आणि आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात आपापली मते स्पष्ट करण्यासाठी अशा प्रकारचा आविर्भाव आणायचं काम दोन्ही पक्षांकडून होत आहे. परंतु आपल्या देशासाठी ज्यांनी रक्त सांडले किंबहुना आपल्या समाजासाठी ज्यांचे देणे आहे त्यांचे पुतळे जर उभारायचे असतील तर राजकीय अभिनिवेशापलीकडे पाहिले पाहिजे.

राजकारणाला काळीमा फासणाऱ्या पद्धतीने नाना पटोले यांची वक्तव्ये येत आहेत. नाना पटोले हे राजकारणातले असंस्कृत असे नेतृत्व आहे. कधी काळी काँग्रेसची (Congress) वैभवशाली परंपरा होती, सुसंस्कृतपणा होता परंतु पटोले यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये त्या पदाची गरिमा घालवली, असे दरेकर म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Rate Today : कांद्याने सर्वसामान्यांना रडवलं! प्रति किलो रुपये इतक्या रुपयांवर पोहोचला; आजचे दर काय? वाचा

Leaf water for constipation: पोट साफ होत नाहीये, आतड्यांमध्ये घाण साचलीये? सकाळी उठल्यावर फक्त या 1 पानाचं पाणी प्या!

Maharashtra News Live Update: श्रावणातील तिसऱ्या सोमवारी घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

Diamond Mangalsutra Designs: नववधूसाठी खास डायमंड मंगळसूत्र; लेटेस्ट 5 डिझाईन्स ट्रेंडिंगमध्ये

8th Pay Commission : 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद होणार? NC-JCM ने सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT