Crime News, Pimpri Chinchwad , Boyfriend , Girlfriend Saam TV
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad : गर्लफ्रेंडसमोर मारहाण झाल्यानं युवकानं केली आत्महत्या; एकावर गुन्हा दाखल

त्यावेळी प्रथमेशचा संताप अनावर झाला होता.

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad : गर्लफ्रेंड (girlfriend) समोर मारहाण केली म्हणून एका युवकानं (बॉयफ्रेंड) आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. ही घटना पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) येथील भोसरी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या आळंदी रोडवर घडली आहे. या घटनेनंतर पाेलिसांनी (police) एका युवकावर गुन्हा दाखल आहे. (pimpri chinchwad latest marathi news)

प्रतीक संतोष कुतवळ अस आत्महत्या केलेल्या (बॉयफ्रेंड) युवकाचं नाव आहे. या प्रकरणात प्रतीकचे वडील संतोष जालिंदर कुतवळ यांनी भोसरी पोलीस ठाणे येथे प्रथमेश महादू पठारे याच्या विरुद्ध तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत पाेलिसांनी पठारे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी : प्रथमेश महादू पठारे आणि प्रतीक कुतवळची गर्लफ्रेंड ही एकमेकांच्या तोंड ओळखीची होती. जेव्हा प्रतीक आपल्या गर्लफ्रेंडशी बोलत होता त्यावेळी प्रथमेश याने त्याला पाहिलं. त्याचा संताप अनावर झाला होता. त्यामूळे प्रथमेशने प्रतीक कुतवळ याच्या गर्लफ्रेंड समोर त्याला जबर मारहाण केली होती. त्यातूनच त्याच्यात आपला अपमान झाल्याची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे त्याने 25 जून 2022 ला आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. या प्रकरणाचा सखोल तपास करून भोसरी पोलिसांनी प्रथमेश पठारे या युवकावर गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: संतापजनक! मुलीने प्रपोज नाकारल्याने हॉटेल मालक संतापला, रिसेप्शनिस्टवर केला बलात्कार

Box Office Collection : 'थामा'च्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घसरण; 'एक दीवाने की दीवानियत'नं किती कमावले? वाचा कलेक्शन

हातपाय बांधले अन् गरम चटके; अनैतिक संबंधातून नांदेडच्या तरूणाची कर्नाटकात हत्या

EPFOचा मोठा निर्णय! पेन्शनच्या ५ नियमांत केले बदल; थेट खिशावर होणार परिणाम

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

SCROLL FOR NEXT