Prashant Koratkar Saam
मुंबई/पुणे

Prashant Koratkar : फरार कोरटकर, कुणाचं पाप? प्रशांत कोरटकरच्या लपाछपीमागे काँग्रेस कनेक्शन? पाहा स्पेशल रिपोर्ट

Prashant Koratkar Latest News : शिवद्रोही प्रशांत कोरटकरच्या तेलंगणात काँग्रेसनेच लपायला जागा दिल्याचा आरोप करण्यात आलाय.. मात्र नेमका हा आरोप कुणी केलाय? आणि काँग्रेसने नेमकी काय प्रतिक्रीया दिलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.....

Bharat Mohalkar

प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी वातावरण चांगलंच तापलंय... कोरटकरच्या तेलंगणातून मुसक्या आवळल्या असल्या तरी आता या प्रकरणी नवा ट्विस्ट आलाय... चिल्लर प्रशांत कोरटकरला काँग्रेस नेत्याच्या घरातून अटक केल्याचा गंभीर आरोप भाजपनं केलाय. तर मुख्यमंत्र्यांनीही अप्रत्यक्षरित्या काँग्रेसकडे बोट दाखवलंय.

फरार कोरटकर, पाप कुणाचं?

कोरटकरला कुणाच्या पक्षाने आश्रय दिला? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केला. तर भाजप आपलं पाप झाकण्यासाठी काँग्रेसवर आरोप करत असल्याचा पलटवार काँग्रेसनं केलाय. कोरटकरवर तोंड न उघडणारे काँग्रेसचं नाव घेत आहेत, असं काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवरार म्हणाले.

प्रशांत कोरटकर नागपूरमधून पसार झाला. त्याला सत्ताधाऱ्यांनी मदत केली असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत होता..आता भाजपने काँग्रेसकडे बोट दाखवलं असलं तरी खरंच शिवद्रोही कोरटकरला काँग्रेस नेत्यांनी मदत केली का? कोरटकर पोलिसांच्या गराड्यातून पसार झाला हे अपयश नेमकं कुणाचं? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत.

त्यामुळे आता पोलीस तपासात कोरटकरच्या लपाछपीमागे नेमकं कोण होतं? याची सखोल चौकशी करायला हवी आणि मदत करणाऱ्यावरही कठोर कारवाई करायला हवी... तरच शिवद्रोहींना मदत करण्याची कुणाची हिंमत होणार नाही....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

Shefali Jariwala Property: शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती किती? वारसदार कोण?

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

SCROLL FOR NEXT