Budget Session Saam tv
मुंबई/पुणे

Budget Session: दरेकरांवरील गुन्हा हा रडीचा डाव, भाजप नेत्यांकडून प्रविण दरेकरांवरील कारवाईचा निषेध

भाजप नेते प्रसाद लाड, विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीवर टीका केलीये

सुरज सावंत

मुंबई: राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. बोगस मजूर प्रकरणी दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन आता भाजप (BJP) नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरु केलं आहे. भाजप नेते प्रसाद लाड, विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीवर टीका केलीये (Prasad Lad, Vinayak Mete, Sadabhau Khot Criticize MVA Govt About Case Filed Against Pravin Darekar).

दरेकरांवर नोंदवण्यात आलेला गुन्हा चुकीचा - प्रसाद लाड

प्रवीण दरेकर यांच्यावर नोंदवण्यात आलेला गुन्हा हा चुकीचा आहे. 25 हजारपेक्षा जास्त संस्था आहेत. यात अनेक मंत्री, आमदार आणि त्याचे नातेवाईक आहेत. असे अनेक आहेत जे मजूर म्हणून निवडून आलेत, मग दरेकरांवर (Pravin Darekar) गुन्हा का नोंदवला, मजूर सोसायटीच्या कायद्यात तो मजूर असावा लागतो. मग इतर जणांवर ही गुन्हा दाखल होणार का?, असा प्रश्न प्रसाद लाड यांनी उपस्थित केला. तसेच, प्रविण दरेकरांवरील गुन्हा आजच रद्द करण्याची मागणीही प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केली.

हा रडीचा डाव आहे - विनायक मेटे

या सदनाचे विरोधीपक्ष नेते यांच्यावर गुन्हा दाखल होतो, ही शरमेची बाब आहे. सरकार विरोधात वेळोवेळी आवाज उठवला जातो म्हणून हा गुन्हा दाखल केला आहे. उद्या आपण सर्व जात्यात येणार आहे. हा रडीचा डाव आहे. तुम्ही भ्रष्ठाचार केला, मग आवाज उठणारचं. पालिकेतही घोटाळा झाला पैसे खाले मग का गुन्हा दाखल झाला नाही, असं विनायक मेटे (Vinayak Mete) म्हणाले.

सरकारची आजची वर्तणूक वाईट - सदाभाऊ खोत

सरकारची आजची वर्तणूक वाईट आहे. आम्ही ग्रामीण भागात कम करतो. ग्रामीण भागातील सोसायटीत राजकीय व्यक्तीच मजूर म्हणून काम करतो. सभागृहातील गोंधळ पाहून कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले, असं सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सांगितलं.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'अल्लाहू अकबर...विमानात बॉम्ब आहे' प्रवाशानं घातला गोंधळ, VIDEO समोर; विमानात नेमकं काय घडलं?

Ramdas Kadam : "पालकमंत्री व्हायचं असेल तर मुंबई-गोवा महामार्ग नीट करा" रामदास कदम यांच भरत गोगावले यांना आवाहन | VIDEO

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Maharashtra Police : प्रमोशन रखडले, निवृत्ती जवळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची फरफट; जाणून घ्या सविस्तर

BMC Recruitment: खुशखबर! बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ५०,००० रुपये; आजच अर्ज करा

SCROLL FOR NEXT