Prakash Amebdkar  Saam tv
मुंबई/पुणे

Prakash Amebdkar : एकटे किंवा सगळे मिळून लढुया, पण...; शिवतिर्थावरून प्रकाश आंबेडकरांचं विरोधकांना मोठं आवाहन

Prakash Amebdkar Speech in Mumbai : या सभेत प्रकाश आंबेडकरांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. 'एकटे किंवा सगळे मिळून लढूया पण लढण्याची तयारी ठेवली पाहिजे, असं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं.

Vishal Gangurde

Prakash Ambedkar Speech :

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली. या सभेत प्रकाश आंबेडकरांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. 'एकटे किंवा सगळे मिळून लढूया पण लढण्याची तयारी ठेवली पाहिजे, असं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं. (Latest Marathi News)

प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

१. देशातील फ्युचर गेमिंग कंपनी, या कंपनीचा नफा 200 कोटी आहे. मग 1300 कोटीचे बाँड या कंपनीने कुठून घेतले. मी अशा अनेक कंपन्यांची नावे सांगू शकतो. याबाबत पंतप्रधान मोदींना या कंपन्यांना सवाल विचारला पाहिजे का नाही. याबाबत लोकांनी विचारलं पाहिजे. ईडीने या कंपन्यांना विचारलं पाहिजे. पण कुणीच काही बोलत नाही.

२. पश्चिम बंगालची परिस्थिती वेगळी आओहे. तिकडे ममता बॅनर्जी यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत.

३. आम्ही ईव्हीएमच्या विरोधात २००४ पासून लढत आहोत. मी ईव्हीएमच्या विरोधात कायदेशीर लढाही देत आहे. ईव्हीएमसाठी अमेरिकेमधून येत आहेत. या मशीनसाठी जी चीप येते, ती २० ते २५ रुपयांमध्ये मिळते.त्यामुळे यामध्ये फेरफार केला जाऊ शकतो.

४. राहुल गांधी यांना माझी विनंती आहे की, ईव्हीएममध्ये फेरफार शक्य आहे. पेपर ट्रेलिंग आणि व्होट यात फरक आहे. यामुळे सगळ्या विरोधकांनी निवडणूक आयोगाला घेरलं पाहिजे. पेपर ट्रेलिंग होऊ शकतं. राहुल गांधी यांनी आवाहन केलं पाहिजे. आम्ही सगळे तुमच्यासोबत एकत्र येऊ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा गावरान स्टाईल चविष्ट भरली वांगी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नीट पुनर्परीक्षा पार्श्वभूमीवर परभणीत परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात

Cancer- Acidity : ॲसिडीटीकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात, असू शकतो कॅन्सरचा धोका

Soaking mangoes: आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का भिजवला जातो?

Gold Price Today: सोनं खरेदीची मोठी संधी! आठवडाभरात 3 हजारांनी घसरले दर, आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT