Maharashtra Politics Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात उलथापालथ होणार? आठवलेंच्या ऑफरनंतर प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'ने ठेवली एक अट

Maharashtra Political News : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना रिपब्लिकन ऐक्यासाठी साद घातली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना ऐक्यासाठी ऑफर

वंचित बहुजन आघाडीकडून आठवलेंना मंत्रीपदाचा राजीनामा आणि भाजपसोबत संबंध तोडण्याची अट

सर्वजित बनसोडेंनी आठवलेंना प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करण्याचं आवाहन

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे या निवडणुकीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना रिपब्लिकन ऐक्यासाठी साद घातली आहे.  रामदास आठवले यांनी साद घातल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची चिंता असेल तर तुमच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या. तुमचा गट वंचित बहुजन आघाडीत विलीन करा, अशी प्रतिक्रिया वंचितचे सर्वजित बनसोडे यांनी दिली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना आवाहन करताना म्हटलं की, दोन दिवसांपासून खासदार रामदास आठवले सातत्याने वंचित बहुजन आघाडी नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी एकत्र येण्यासंदर्भात भाष्य करत आहेत. त्यांना माझा सवाल आहे की, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाचे रक्षण करण्याऐवजी आरपीआयमध्ये फूट पाडून स्वतःचा स्वतंत्र गट निर्माण केला आहे'.

'जर रामदास आठवले यांना प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे असेल. तर पहिले त्यांनी आपले मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि आरपीआय गटाचा भाजपशी असलेला संबंध तोडावा. जर आंबेडकरी ऐक्याचा खरा विचार असेल, तर आरपीआयमधून फूट पाडून तयार झालेला त्यांचा गट वंचित बहुजन आघाडीत विलीन करावा, असे ते म्हणाले.

'भविष्यातील निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली काम करण्याची प्रतिज्ञा करावी, असे आवाहन सर्वजित बनसोडे यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Video Viral: दारूच्या नशेत थेट रेल्वे रूळावर झोपला; समोरून अचानक ट्रेन आली आणि...! मुंबईतील स्टेशनवरील घटनेता Video Viral

HSC Board Exam : कॉपी बहाद्दरांवर कारवाईचा बडगा! चीट पुरवल्याप्रकरणी २६ शिक्षक निलंबित

New Aadhaar App: आधारची कामे होणार एका क्लिकवर; नवीन अ‍ॅपची फीचर्स कोणते ? वाचा

IND vs PAK : विजयानंतर टीम इंडियाचा जल्लोष, पराभूत पाकिस्तानचे खेळाडू हँडशेकसाठी वाट पाहत राहिले? व्हिडिओ पाहा अन् खरं काय ते ठरवा

Maharashtra Live News Update: संयम पाळतोय म्हणून... औलाद समजू नका, अजित पवार विमान अपघाताच्या बाबत रूपाली ठोंबरे आक्रमक

SCROLL FOR NEXT