Prakash Ambedkar-Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

ठाकरे-आंबेडकरांची ताकद एकत्र? वंचितचे मागील लोकसभा-विधानसभेतील आकडे विरोधकांचं टेन्शन वाढणारे

मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे या प्रमुख नेत्यांच्या चर्चा सुरु आहेत.

साम टिव्ही ब्युरो

>> निवृत्ती बाबर

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात खलबतं सुरु आहेत. मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये दोन पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या चर्चा सुरु आहेत.  (Maharashtra Politics News)

ठाकरे-आंबेडकर यांच्यात सुरु असलेल्या बैठकीमुळे शिंदे गट-भाजपचं टेन्शन वाढलं आहे. कारण ठाकरे गट आणि वंचितची युती झाल्यात मोठी ताकद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळेल. (Prakash Ambedkar)

कारण मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची चांगली मतं मिळवली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या अनेक उमेदवारांचा पराभव वंचितने मिळवलेल्या मतांमुळे झाला होता.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएमने एकत्रित निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांना एकत्रित मिळवून 41 लाख 32 हजार 242 मते मिळाली होती.तर महाराष्ट्र विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पक्षाने २८८ जागांवर आपले उमेदवार उभे होते. यामध्ये त्यांना २४ लाख मतं मिळाली होती.

वंचितची विधानसभा २०१९ ची आकडेवारी

२०१९ विधानसभेच्या २८८ जागांपैकी ७८ विधानसभा मतदार संघात वंचिताच्या उमेदवाराला सरासरी २५ ते ३५ हजार मते मिळाली होती. १८ विधानसभा मतदारसंघात सरासरी १५ हजारहून अधिक मते मिळाली होती. ६० विधानसभा मतदारसंघात सरासरी १० हजाराहून अधिक मते मिळाली होती. १३२ विधानसभा मतदारसंघात सरासरी नऊ हजारांवरून अधिक मते मिळाली.

Edited by- Pravin Wakchoure

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसने केली मोठी कारवाई

Kharik Khobra Laddu: हिवाळ्यात बनवा खारीक-खोबऱ्याचे पौष्टिक लाडू, महिनाभर टिकतील

Colon cancer: हे 6 संकेत दिसले तर समजा आतड्यांचा कॅन्सर झालाय

Sunny Deol: लाजा वाटत नाहीत का? घरापर्यंत आलेल्या पॅप्सला सनी देओलने घातल्या शिव्या

Delhi Blast: ८ दहशतवादी, ४ शहरं आणि ४ कार... फक्त दिल्लीच नव्हे तर देशाला हादरवण्याचा होता प्लान; तपासातून धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT