Maharashtra Politics : Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेने महाविकास आघाडीची डोकेदुखी; यंदा विधानसभेत 'वंचित फॅक्टर'चा फटका बसणार का? पाहा व्हिडिओ

Prakash Ambedkar News : प्रकाश आंबेडकरांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एकला चलोरेची भूमिका निवडली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde , साम टीव्ही न्यूज नेटवर्क

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणूकीसाठी प्रकाश आंबेडकरांनी राज्यभर दौरा केल्यानंतर आता एकला चलो रेची भूमिका घेतली आहे. राज्यातल्या कोणत्याही प्रमुख पक्षासोबत आघाडी करण्यासाठी कोणताही पुढाकार घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे मविआचं डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणूकीवेळी महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिस्कटल्याने प्रकाश आंबेडकरांनी 38 जागांवर उमेदवार दिले होते. त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसला होता.

आंबेडकरांची भूमिका आघाडीची डोकेदुखी

अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना 2 लाख 76 हजार 746 मतं मिळाली...तर काँग्रेसच्या अभय पाटलांचा 40 हजार मतांनी पराभव

बुलढाण्यात वंचितच्या वसंतराव मगरांना 98 हजार मतं मात्र 29 हजार मतांनी ठाकरे गटाच्या खेडकरांचा पराभव

हातकणंगलेत वंचितच्या डी सी पाटलांना 32 हजार मतं मात्र ठाकरे गटाच्या सत्यजित पाटलांचा 13 हजार मतांनी पराभव.

वायव्य मुंबईत वंचितच्या परमेश्वर रणशूर यांना 10 हजार मतं. तर ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकरांचा केवळ 48 मतांनी पराभव

2019 मध्ये वंचितला 41 लाख मतं मिळाल्याने वंचित फॅक्टर चर्चेत आला होता. मात्र 2024 च्या लोकसभेला वंचित फॅक्टर चमत्कार दाखवू शकला नाही. त्यामुळे वंचितला अवघे15 लाख 66 हजार मतं मिळाली. त्यामुळे आंबेडकरांनी ओबीसी आणि आदिवासींना साद घालत नवी रणनीती आखलीय. आता त्यांनी एकला चलोरेची भूमिका घेतल्यामुळे मविआला त्याचा किती फटका बसणार याची उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT