Pradip Purnekar Case Saam T
मुंबई/पुणे

Pradeep Purnekar Case: पूर्णेकरांच्या हत्येच्या कटात मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीचा सहभाग, ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप

Sanjay Raut On Pradip Purnekar Case: संजय राऊत यांनी प्रदीप पूर्णेकर हत्याकांडावरून फडणवीस सरकारला इशारा दिला. यावेळी त्यांनी या हत्येच्या कटात मीनाक्षी शिंदे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला.

Priya More
  • प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात संजय राऊत यांचे गंभीर आरोप

  • मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे या हत्येच्या कटात सहभागी असल्याचे ते म्हणाले

  • प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्याची राऊतांची मागणी

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि ठाणे पोलिसांवर जोरदार निशाणा साधला आहे. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांचा पूर्णकर यांच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक का होत नाही? असा सवाल करत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही इशारा दिलाय. ठाण्यातील सर्वपक्षीय आंदोलन, आदित्य ठाकरे यांचा मोर्चा, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंधांवरही संजय राऊत यांनी भाष्य केलं.

संजय राऊत यांनी सांगितले की, 'त्यांनी त्यांच्या पक्षातल्या पदाचा राजीनामा दिला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आमची मागणी आहे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा कट रचन्यामध्ये मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा सहभाग आहे. याचे पुरावे सर्व आरोपी एकत्र बसलेले आहेत. राजेंद्र शिंदे आणि मिनाक्षी शिंदे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी हत्येची सुपारी दिली हे सगळं अशा प्रकारचं कारस्थान झाला आहे हे ठाणे पोलिसांना माहिती आहे. ठाणे एसआयटी यांना माहिती आहे त्या भागाचे पालकमंत्री शिंदे यांना माहिती आहे. प्रत्येकाला याची माहिती आहे.'

संजय राऊत यांनी पूर्णकर हत्याकांड प्रकरणात आरोपींना वाचवलं जात असल्याचा आरोप केला. 'काल जो आम्हाला विरोध करण्याचा प्रयत्न झाला त्यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी पुरावे पाहायला पाहिजे आणि मुख्य आरोपी याच्या अटकेसाठी त्यांनी आमच्याबरोबर सहभागी व्हायला पाहिजे. तुम्ही कोणाला वाचवत आहात बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना इतकी अमानुष नव्हती. पण तुम्ही डुबलीकेट आहात. त्यांची हत्या झाली. त्यांचा कुटुंबियांचे दु:ख तुम्हाला काय कळणार.', असे त्यांनी सांगितले.

संजय राऊत यांनी पूर्णेकर हत्याकांड प्रकरणावरून फडणवीस आणि शिंदेंना इशारा दिला. ते म्हणाले की, 'पूर्णेकर यांचा मुलगा एकटा पालकमंत्री यांच्या घरी निवेदन द्यायला जात होता सत्य काय आहे हे सांगण्यासाठी. त्याला पोलिसांनी उचलून फडफडत रिक्षामध्ये कोबलं. ज्याने बाप गमावला जिने पती गमावला त्यांच्याशी हे सरकार अशा प्रकारे वागत आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये पूणेकर प्रकरण राज्याच्या गृहमंत्री आणि पालकमंत्री यांना महाग पडल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Expressway Protest: समृद्धी महामार्ग अडवण्यासाठी ठाकरेसेना रस्त्यावर; नितीन देशमुखांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं!

Maharashtra News Live Update: पुणे शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले आमदार कौस्तुभ गावडे भाजप नेत्यांच्या बैठकीला

Bank Holiday: उद्या ३१ ऑक्टोबरला बँकेत जाण्याआधी थांबा! बँका बंद की सुरू? लगेचच घ्या जाणून

Diabetes Diet : डायबिटिस पेशंटसाठी कोणती रोटी सर्वात बेस्ट? एक्स्पर्ट्स काय सांगतात? वाचा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! खात्यात २००० रुपये जमा, लगेच तुमचे नाव तपासा

SCROLL FOR NEXT