DRDO Director Pradeep Kurulkar News Update  Saam Tv
मुंबई/पुणे

Honey Trap Case: डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी अ‍ॅप्सच्या माध्यमातून पाकिस्तानला कोणती माहिती दिली? ATSकडून तपास सुरू

Vishal Gangurde

अक्षय बडवे

DRDO scientist honey trap case: डीआरडीओचे (DRDO) पुण्याचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणाची मोठी अपडेट समोर आली आहे. प्रदीप कुरुलकर यांनी त्यांच्या मोबाईलमधून काही अॅप्स डिलीट केल्याची माहिती पुणे फॉरेन्सिक लॅबने कोर्टाला दिली आहे. तसेच कुरुलकर यांनी आणखी कोणती माहिती पाकिस्तानला दिली का, याचा तपास एटीएसने सुरू केल्याची माहिती मिळत आहे. (latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, डीआरडीओचे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी त्यांच्या मोबाईलमधून काही ॲप्स डिलीट केले आहेत, अशी माहिती पुणे (Pune) फॉरेन्सिक लॅबने कोर्टाला दिली आहे. तसेच अॅप्सच्या माध्यमातून कुरुलकर यांनी आणखी कोणती माहिती पाकिस्तानला दिलीय का, याचा तपास एटीएस करत असल्याची माहिती मिळत आहे.

'कुरुलकरांचा वन प्लस 6 T हा मोबाईल गुजरातमधील फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पुढच्या तपासासाठी पाठवण्याची परवानी एटीएसने न्यायालयाकडे मागितली आहे. तसेच पाठवण्यात येणारा मोबाईल कुरुलकंरांचाच आहे का, हे आयएमइआय नंबर तपासून खात्री करून घेण्यात यावी, अशी मागणी कुरुलकर यांच्या वकिलांनी केली आहे, अशी माहिती हाती आली आहे.

'मोबाईल (Mobile) गुजरातमधील फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्याची एटीएसची मागणी आहे. तसेच कुरुलकंरांच्या जामीन अर्जावर म्हणणं मांडण्यास एटीएसने 18 ऑगस्टपर्यंत मुदत मागून घेतली आहे.

दरम्यान, एटीएसच्या तपासानंतर कुरुलकर यांनी देशाच्या सुरक्षेशी संबंधित कोणती गोपनीय माहिती सांगितली आहे? तसेच किती माहिती दिली आहे, अशा काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT