Siddhivinayak Temple To Acquire 100 Crore Building For Expansion : 
मुंबई/पुणे

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिराचा मोठा निर्णय! १०० कोटींची इमारत खरेदी करणार

Siddhivinayak Temple Building Expansion : प्रभादेवीतील शेजारील राम मॅन्शन ही तीन मजली इमारत ट्रस्ट खरेदी करणार आहे. सुमारे ₹100 कोटी देऊन ट्रस्ट ही इमारत घेणार आहे. दर्शनासाठी रांग व्यवस्थापन, प्रसाद कक्ष, स्वच्छतागृहे, भक्तांसाठी सोयीसुविधा यासाठी अतिरिक्त जागा मिळवण्याचा उद्देश आहे.

Namdeo Kumbhar

  • सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट १०० कोटींना शेजारील राम मॅन्शन इमारत खरेदी करणार

  • या खरेदीमुळे मंदिर परिसरात १,८०० चौ. मी. अतिरिक्त जागा उपलब्ध होणार

  • शिर्डी साईबाबा मंदिर धर्तीवर दर्शन कॉम्प्लेक्स, प्रसाद कक्ष, स्वच्छतागृहे यासारख्या सुविधा उभारणार

  • सरकारकडून मंजुरी मिळाली असून, रहिवाशांना बाजारभावाच्या दुप्पट रक्कम देण्याची तयारी

Mumbai’s Siddhivinayak Temple : मुंबईमधील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने मंदिराच्या विस्ताराचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेजारी असणारी तीन मजली राम मॅन्शन ही इमारत तब्बल १०० कोटी रूपयांना खरेदी करणार आहे. शिर्डीमधील साईबाबा मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी प्लॅन तयार करण्यात येत आहे. रांगेची समस्या सोडवण्यासाठी सिद्धिविनायक मंदिराने इमारत खरेदीचा निर्णय घेतला. त्यासाठी ट्रस्टकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मंदिर ट्रस्टने खरेदीसाठी सिद्धिविनायक कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी चर्चा सुरू केली आहे. जागेमुळे मंदिराला एकूण 1,800 चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे. त्या जागेवर भक्तांसाठी अनेक सोयी-सुविधा करण्यात येणार येतील.

टाईम्स ऑफ इंडियाने सिद्धिविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य पवन कुमार त्रिपाठी यांच्या हवाल्याने १०० कोटींच्या खरेदीचे वृत्त दिले आहे. त्रिपाठी म्हणाले की, मंदिराच्या जवळील राम मॅन्शन इमारत खरेदी अंतिम टप्प्यात आहे. सिद्धिविनायक सोसायटीशीही चर्चा सुरू आहे. या अतिरिक्त जागेमुळे मंदिराची पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी उपक्रमांना मोठी चालना मिळेल. दरम्यान, राम मॅन्शन ही इमारत काही वर्षांपूर्वी जुन्या चाळीच्या जागेवर बांधली आहे. या इमारतीत २० छोटे 1 BHK फ्लॅट आहेत. या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर मालक राहतो. त्याने आपल्या खोल्या या रेंटवर दिल्या आहेत, असे प्रभादेवीमधील एका रिअल इस्टेट ब्रोकरने सांगितले.

सिद्धिविनायक मंदिराच्या जवळील राम मॅन्शन ही इमारत 708 चौरस मीटर इतक्या जागेवर आहे. या इमारतीचे गेट (प्रवेशद्वार) हे सिद्धिविनायक सोसायटी मंदिराच्या ट्रस्टच्या अगदी समोरच आहे. जागांच्या एकत्रीकरणामुळे शिर्डीमधील साईबाबा मंदिरासारखा दर्शन रांग कॉम्प्लेक्स उभारता येऊ शकते, असे मंदिर प्रशासनाने सांगितले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर भक्तांना दर्शन रांगेत उभारताना होणारा त्रास कमी होणार आहे. सध्या दर्शनाच्या रांगा या रस्त्यावर बॅरिगेट्सच्या मागे लगतात. त्यामुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या नव्या जागेत प्रसाद कक्ष, स्वच्छतागृहे यासारख्या सुविधा केल्या जाणार आहेत.

राम मॅन्शनच्या खरेदी करताना कोणतीही अडचण येणार नाही. ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर म्हणाले की, राम मॅन्शनच्या रहिवाशांना देण्यात येणारी १०० कोटींची रक्कम ही बाजारमूल्याच्या जवळपास दुप्पट आहे. दरम्यान, या खरेदीसाठी राज्य सरकारकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सिद्धिविनायक ट्रस्ट हे राज्याच्या कायदा आणि न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली आहे. सरकारकडून या खरेदीला मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sabudana Chaat : नवरात्री उपवास स्पेशल रेसिपी; उपवासासाठी हेल्दी साबुदाणा चाट

Aayush Komkar Case: आयुष कोमकर हत्या प्रकरणी दोघांना अटक, गोळीबारानंतर हल्लेखोर म्हणाले - 'इथे फक्त आंदेकरच...'

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

Shantanu Naidu Girlfriend : रतन टाटांचा विश्वासू शांतनु नायडूकडून प्रेमाची कबुली; फोटोतील तरुणी आहे तरी कोण?

Pune Metro : पुणे मेट्रो सुसाट! २४ तासांत तब्बल ६ लाख जणांचा प्रवास, गणेशोत्सवात मेट्रोची कोट्यवधींची कमाई

SCROLL FOR NEXT