powai Rohit Arya encounter update  Saam tv
मुंबई/पुणे

Rohit Arya encounter : पवई ओलीसनाट्यातील आरोपीचा एन्काऊंटर; पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू

powai Rohit Arya encounter update : पवई ओलीसनाट्यातील आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

पवईतील आर ए स्टुडिओमध्ये आरोपी रोहित आर्यने १९ जणांना ठेवलं होतं ओलीस

पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आरोपी रोहित जखमी

रुग्णालयात दाखल केल्यानंतर आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू

पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे सर्व १७ लहान मुलं आणि इतर ओलीस सुरक्षित .

मयूर राणे, साम टीव्ही

पवई ओलीस नाट्यप्रकरणात मुंबईतील पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एकीकडे पोलिसांनी १७ ओलीस मुलांना सोडवलं. दुसरीकडे पोलिसांनी आरोपीवर गोळीबार देखील केला होता. गोळीबारात जखमी झालेल्या आरोपी रोहित आर्यला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आरोपी रोहित आर्य याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी रोहित आर्य याने लहान मुलांना ऑडिशनसाठी बोलावलं होतं. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले होते. रोहित आर्य याने १७ लहान मुले, १ ज्येष्ठ नागरिक आणि एका व्यक्तीला ओलीस ठेवलं होतं.

रोहित आर्य याच्याजवळ एअरगन आणि काही केमिकल पदार्थ होते. ओलीस ठेवल्यानंतर पोलीस घटनास्थळी धावले. यादरम्यान रोहित आर्य याने पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्य जखमी झाला. त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली होती. जखमी झालेल्या रोहित आर्य याला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचारादरम्यान रोहित आर्य याचा मृत्यू झाला.

रोहित आर्य याच्याकडे एअरगन आणि काही केमिकल्स होते. लहान मुलांना ओलीस ठेवल्यानंतर त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात व्हिडिओमध्ये रोहित आर्य बोलताना दिसतोय. त्याने व्हिडिओमध्ये प्रश्न विचारायचे आहेत, असं म्हटलं होतं. या व्हिडिओमध्ये त्याने लहान मुलांना जाळून मारण्याची धमकी दिली होती.

रोहित आर्य याचा एपीआय अमोल वाघमारे यांनी एन्काऊंटर केला. पोलिस आणि रोहित आर्य यांच्याच चकमक झाली. या चकमकीत रोहित आर्य याच्या छातीला गोळी लागली होती. जखमी झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने ताब्यात घेत त्याला रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात रोहित आर्य याचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT