possibility of floods in rainy season at waldhuni river remove encroachment demands kalyan citizens  Saam Digital
मुंबई/पुणे

वालधुनी नदीपात्रातील बांधकामावरुन कल्याण पूर्वेतील 3 हजार कुटुंबांचा निवडणुकीवर बहिष्कार

कल्याण डोंबिवली महापालिकेने १३ ठिकाणी बीओटी प्रकल्प राबविण्याचे ठरविले होते. त्यापैकी चार ठिकाणी हे प्रकल्प राबविले गेले. विठ्ठलवाडी स्टेशन समोरीली जागेत वाणिज्य वापरासाठी विकसीत करण्याचे ठरले.

Siddharth Latkar

- अभिजित देशमुख

Kalyan :

कल्याण पूर्वेत वालधूनी नदी पात्रात भराव टाकण्यात आल्याने पावसाळयात या ठिकाणी पुराचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान नदीपात्रातील बांधकाम थांबवा अन्यथा आमरण उपोषण छेडू तसेच पुढील निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. (Maharashtra News)

कल्याण पूर्वेत विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन समोरच कल्याण डोंबिवली महापालिकने बीओटी तत्वावर एक भूखंड विकसीत करण्याचे काम एका कंत्राटदाराला दिले आहे. या कंत्राटदाराकडून वालधूनी नदी पात्रात मातीचा भराव टाकला जात आहे. या भरावामुळे नदीचे पात्र अरुंद होत आहे.

दरवर्षी पावसाळ्यात या नदीला पूर येतो. आजूबाजूच्या हजारो लोकांच्या घरात पाणी शिरते. या नदीचे पात्र अरुंद झाल्यास पावसाळ्यात नदीपात्रालगत असलेल्या जवळपास ३ हजार घरांना जलमय परिस्थितीच सामोरे जावे लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून हे काम थांबवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अन्यथा पुढील आठवड्यात याच नदीपात्रात आमरण उपोषण सुरू करणार. तसेच इथून पुढील निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील या नागरिकांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजन कसं करायचं? जाणून घ्या A टू Z साहित्यादी संपूर्ण यादी

Railway jobs : ग्रॅज्युएशन झालंय? रेल्वेत करा नोकरी, ५८०० जागांसाठी निघाली मेगा भरती, वाचा A टू Z माहिती

Skin Care: ड्राय स्किनला करा Bye Bye! या ‘मॅजिक ऑईल्स’नी चेहरा होईल सॉफ्ट आणि ग्लोइंग

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Krantijyoti Vidyalay: नवीन वर्षात भरणार मराठी शाळा; 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' नूतनवर्षी प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT