Sharad Pawar
Sharad Pawar SaamTV
मुंबई/पुणे

22 संघटना संप मागे घेण्यावर सकारात्मक; कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. आज एसटी कर्मचारी कृती समिती आणि शरद पवार, अनिल परब यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली आहे. आणि या बैठकीत कृती समितीने कर्मचाऱ्यांना संप मागे घेवून कामावर जाण्याचे आवाहन केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून संप सुरू आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) मार्गदर्शनाखाली आज 22 संघटनांशी चर्चा केली. विलीनीकरण ही प्रमुख मागणी होती. मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) त्रिसदस्यीस समिती नेमली आहे. त्यांचा जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल. (Maharashtra ST Strike latest news updates)

विलीनीकरणाचा मुद्दा कोर्टात आहे. कर्मचाऱ्यांनी यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही पगारवाढ केली आहे असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्याने पगारात तफावत आहे, त्यामुळे आज चर्चा करुन योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तीन वेळा मुदत दिली पण कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही म्हणून कारवाई करावी लागली असे पबर म्हणाले. अनिल परब यांनी आजही कामगारांनी संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. संप हा मार्ग नाही याने सर्वसामान्य लोकांना वेठीस धरलं जात आहे त्यामुळे चर्चेतून मार्ग काढू असे अनिल परब म्हणाले.

आज परिवहन मंत्री , आणि सगळ्यांशी चर्चा झली आहे. महाराष्ट्रातला प्रवासी हा फार महत्वाचा आहे. प्रवाश्यांचा स्थितीचे वर्णन न केलेलं बरं त्यात कोरोनाचा नवा अवतार समोर आला आहे. आज महाराष्ट्राच्या अर्थकारणावर मोठा परिणाम सुरू आहे. राज्य सरकारला त्याची किंमत देण्याची स्थिती असताना कृती समितीने काही मुद्दे मांडले, एक सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी मंत्र्यांनी मान्य केली कर्मचाऱ्यांनी सेवेत यायला हवं आपण मार्ग काढू शकू, कृती समितीतील सगळ्या नेत्यांना कामगारांच्या आणि प्रवाश्यांचा हित बघून हा आग्रह आहे. असे बोलून शरद पवार यांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकारच्या वतीने मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलीय, त्याचा विचार करावा असेही शरद पवार म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT