BJP leader Pooja More breaks down after withdrawing her nomination amid a viral video controversy in Pune municipal elections. Saam Tv
मुंबई/पुणे

एक व्हिडीओ, उमेदवारी गेली, भाजपकडून ट्रोल, माघारीनंतर रडारड

Pooja More Nomination Withdrawn: पुणे महापालिकेत भाजप उमेदवार पूजा मोरेच्या माघारीनंतर मोठा गोँधळ झाला... मात्र पुजा मोरेंनी माघार का घेतली....आणि पुजा मोरेच्या नावाने व्हायरल होणारा व्हिडीओ खरा आहे की खोटा...

Bharat Mohalkar

या आहेत भाजप समर्थकांच्या ट्रोलिंगमुळे पुणे महापालिका निवडणुकीतून माघार घेतलेल्या पूजा जाधव.... 8 वर्षात 5 पक्ष बदललेल्या पूजा मोरेंना भाजपनं वॉर्ड 2 अ मधून उमेदवारी जाहीर केली.. मात्र पूजा मोरे यांचा पहेलगाम हल्ल्यानंतरचा व्हिडीओ व्हायरल करत भाजप समर्थकांनी आपल्याच उमेदवाराला जोरदार ट्रोल केलं...

फक्त हा एकच नाही तर मराठा क्रांती मोर्चात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा करत आणखी एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला... मात्र व्हिडीओतील मुलगी आपण नसल्याचं सांगत आपला राजकीय बळी दिला जात असल्याचा आरोप पूजा मोरेंनी केलाय..

खरंतर 2017 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून राज्यातील सगळ्यात तरुण पंचायत समिती सदस्य बनलेल्या पूजा मोरे पुढं मराठा क्रांती मोर्चा, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या... राष्ट्रवादीत असताना पूजा मोरेंनी फडणवीसांच्या महाजनादेश यात्रेला काळे झेंडे दाखवले होते.. त्या प्रकरणी मोरेंना अटक करण्यात आली.. पुढे पूजा मोरे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही सहभागी झाल्या...

एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीला स्वराज्य पक्षातून गेवराई विधानसभा निवडणूक लढवली... तर धनंजय जाधव यांच्याशी विवाह झाल्यानंतर पूजा पुण्यात स्थायिक झाल्या.. तर स्वातंत्र्यदिनाला मांसाहार बंदीचा आदेश निघाल्यानंतर धनंजय आणि पूजा यांनी चिकन वाटप केल्यानं त्या चर्चेत आल्या होत्या... याच जोरावर पूजाला भाजपनं उमेदवारी दिली... मात्र भाजप समर्थकांनीच जोरदार विरोध केल्यानंतर पूजा यांना माघार घ्यावी लागली.. त्यावरुन मनोज जरांगेंनी पूजा मोरे यांच्यावर अन्याय झाल्याचं म्हटलंय..

पहेलगाम हल्ल्यानंतर पूजा मोरे यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्यावर भाष्य केलं होतं... तर दुसरीकडे सरकारच्या निर्णयाविरोधातच पूजा यांनी मटन वाटपाचा कार्यक्रम घेतल्यानं भाजप समर्थक नाराज झाले.त्यामुळे पक्षनिष्ठा दाखवण्यासाठी त्या त्या वेळी घेतलेल्या जाहीर भूमिकानीच पूजा मोरेंना भाजपच्या उमेदवारीवर पाणी सोडावं लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खाकी वर्दीला काळिमा! आधी पाठलाग, नंतर एकट्यात गाठलं अन्...; पोलीस अधिकाऱ्याचं धक्कादायक कृत्य

धक्कादायक! भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले; गोळीबारात एक जण गंभीर जखमी

भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

महागड्या गाड्या, सोनं चांदी आणि कोट्यावधींची मालमत्ता; पुण्यातील श्रीमंत उमेदवारांची यादी समोर

धनुभाऊंच्या विरोधकांना दादांचा आशीर्वाद? धनंजय मुंडे- अजित पवारांमध्ये बिनसलं?

SCROLL FOR NEXT