IAS Pooja Khedkar Case Saam Digital
मुंबई/पुणे

Pooja Khedkar Case: पूजा खेडकरने ठोठावला हायकोर्टाचा दरवाजा, IAS पद परत मिळवण्यासाठी देणार कायदेशीर लढा

Priya More

प्रमोद जगताप, दिल्ली

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात (Pooja Khedkar Case) मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) धाव घेतली आहे. यूपीएससीने (UPSC) आयएएस पद रद्द केल्याप्रकरणी पूजा खेडकरने हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी पूजा खेडकरने केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकरने आधी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. अशामध्ये अटकेच्या भीतीने पूजा खेडकर पळून गेली असल्याची चर्चा सुरू आहे. पूजा खेडकरचा मोबाईल देखील नॉटरिचेबल लागत आहे. त्यामुळे पूजा खेडकर सध्या आहे कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अशामध्ये पूजा खडेकरने दिल्ली हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. पूजा खेडकर आता आयएएस पद मिळवण्यासाठी कायदेशीर लढा देणार आहे. यासाठी तिने याचिका दाखल करत लवकर सुनावणी घ्यावी अशी मागणी केली आहे. यासाठी आज सकाळी कोर्टात प्रकरण मेंशन केलं जाण्याची शक्यता आहे. पूजा खेडकरने याचिकेमध्ये DOPT ला पक्षकार बनवले आहे. रविवारी रात्री पूजा खेडकरने ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. आता कोर्ट काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला कोर्टाने जामीन मंजूर केला. त्यानंतर ३ जुलै रोजी येरवडा कारागृहातून मनोरमा खेडकरची सुटका झाली. मनोरमा खेडकर यांना मुळशीतील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत धमकावले होते. याप्रकरणी त्यांना पुणे पोलिसांनी महाडमधून अटक केली होती. अटकेनंतर मनोरमा खेडकरची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. त्यांना आता जामीन मिळाला असून त्या जेलमधून बाहेर आल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT