Political News : छत्रपती संभाजीनगरमधील महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेत सर्वच नेत्यांनी शिवसेना, भाजपवर निशाणा साधला. मात्र या सभेत उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेल्या वेगळ्या खुर्चीवरुन आता राजकारण रंगू लागलं आहे. उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेल्या वेगळ्या खुर्चीवरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांना मोठी खुर्ची दिल्याने नाना पटोले सभेला गेले नसावे, असा खोचक टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी खुर्ची दिली, त्यांचा राजेशाही थाट होता. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा नामोनिशाण दिसत नव्हता. अजित पवार तिसऱ्या चौथ्या खुर्चीवर, जयंत पाटील कुठे तर अशोक चव्हाण कुठे, अशी स्थिती होती. (Latest Marathi News)
तिथेच एवढा वाद तयार झाला की उद्धव ठाकरे बोलत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सभेतून निघून गेले, हे तुम्ही व्हिडीओ तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला दिसेल. कालच्या सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अपमान झाला आहे, असं चंद्रशेखर बानवकुळे यांनी म्हटलं.
खुर्चीबाबत अजित पवारांचा स्पष्टीकरण
उद्धव ठाकरे यांना शारीरिक त्रास आहे. त्यांना पाठीचा त्रास आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यांना ताठ बसता यावं म्हणून वेगळी खुर्ची देण्यात आली होती. बसण्यात कोणताही भेदभाव नव्हता तरीही तशा बातम्या माध्यमांमध्ये आल्या.
आम्ही चांगल्या पद्धतीने एकोप्याने या सर्व गोष्टींना सामोरं जात आहोत. वज्रमुठ आम्ही ज्यावेळी सांगतो, आमची सर्वांची भूमिका देखील तीच आहे, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.