Shiv Sena and Team Omi Kalani Announce Partnership Saam
मुंबई/पुणे

उल्हासनगरात राजकीय भूकंप; भाजपला झटका, १५ नगरसेवकांच्या पक्षाकडून शिवसेना शिंदे गटासोबत युती जाहीर

Ulhasnagar Political News: उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना–कलानी गटाची युती जाहीर. या युतीमुळे भाजपला मोठा धक्का बसला. टीम कलानीच्या १५ नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा.

Bhagyashree Kamble

  • उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना–कलानी गटाची युती जाहीर.

  • या युतीमुळे भाजपला मोठा धक्का बसला.

  • टीम कलानीच्या १५ नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा.

  • शहराच्या विकासासाठी ही युती महत्त्वाची असल्याचं ओमी कलानी यांचं विधान.

अजय दुधाणे, साम टिव्ही

उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच मोठं राजकीय समीकरण बदललं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांच्यात दोस्ती का गठबंधन जाहीर करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे भाजपला धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

उल्हासनगर शहरात आगामी महानगरपालिका निवडणुकीआधी शिवसेनेने मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. भाजपचा कट्टर विरोधक अर्थात टीम कलानी गटासोबत शिवसेना शिंदे गटाने युतीची घोषणा केली आहे. नुकत्याच झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे.

या दोस्ती का गठबंधनच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संसदीय गटनेते आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरात भेट दिली. यावेळी टीम ओमी कलानीचे सर्वेसर्वा ओमी कलानी तसेच त्यांच्या सदस्यांमा पेढा भरवून आनंद व्यक्त केला आहे.

आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीम कलानीच्या तब्बल १५ नगरसेवकांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी ओमी कलानी म्हणाले, 'हि महायुती झालेली आहे, कोणता पक्ष कमी करायचा आणि आपला पक्ष वाढवायचा असा काही शिवसेनेचा आणि खासदारांचा विचार नाही, फक्त शहराचा विकास अधिक प्रमाणात व्हावा, ती सर्व शहरवासीयांची मागणी आहे, त्याकरता सर्व एकत्र आलेले आहेत', असं ते म्हणाले.

राज्यात सत्तेत असूनही शिवसेना–भाजप युतीचा उल्हासनगरात अद्याप निर्णय नाही. अशावेळी कलानी गटासोबतची युती जाहीर करून शिवसेनेने भाजपला धक्का दिला आहे. कलानी कुटुंबाचे शहरातील वर्चस्व लक्षात घेता, शिवसेना आता त्यांची ताकद आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या नव्या समीकरणामुळे भाजपला राजकीय फटका बसणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT