Parambir Singh/ CBI/Sachin Waze Saam TV
मुंबई/पुणे

सचिन वाझेला सेवेत घेण्यासाठी राजकीय दबाव; CBI जबाबात परमबीर सिंहांचा बड्या नेत्यांवर आरोप

'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार आणि इतर काहींना महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गैरकृत्यांबद्दल माहिती दिली होती.'

सुरज सावंत

मुंबई : सचिन वाझेला (Sachin Waze) पुन्हा सेवेत घेण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच माझ्यावर दबाव टाकला होता असा धक्कादायक खुलासा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. १०० कोटी वसूली प्रकरणात परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबा दरम्यान अनेक राजकीय नेत्यांवर आरोप करत धक्कादायक खुलासे केले.

CBI ला दिलेल्या जबाबत त्यांनी सांगितलं की, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि इतर काहींना महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गैरकृत्यांबद्दल माहिती दिली होती.

मी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना देशमुख (Anil Deshmukh) यांच्या गैरव्यवहारांबद्दल माहिती देण्याआधीच त्यांना याबाबत या प्रकरणांची जाणीव होती, असा दावाही परमबीर यांनी केला. तसंच सचिन वाजेला पून्हा सेवेत घेण्याबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझ्यावर दबाव आणला होता असही सिंग CBI जबाबात म्हणाले आहेत.

अनिल देशमुख यांचा प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप असायचा, माझ्या परस्पर देशमुख अधिकाऱ्यांना फोन करून मी दिलेल्या आदेशानंतरही गुन्ह्यामध्ये हस्तक्षेप करायचे. राजकीय फायद्यासाठीही देशमुखांनी मोहन देलकर प्रकरणात आपणाला विश्वासात न घेताच SIT ची स्थापन करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचंही सिंग यांनी सांगितलं.

देशमुख हे अनेक गुन्ह्याबाबत अधिकारऱ्यांना स्वत: आदेश देत असत, तसेच माझा पश्चात देशमुख अधिकार्यांना बोलावून आदेश द्यायचे या आदेशाबाबत किंवा अधिकार्यांच्या भेटीबाबत मला काहीच सांगितले जायचे नाही. माझा परवानगी शिवाय अनेक गुन्ह्यात ते अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. यात प्रामुख्याने TRP केस, फेक फाॅलोअर्स केस, संजय छाब्रीया केसचा समावेश असल्याचं परमबिर सिंग यांनी सीबीआयला सांगितलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ₹३००० एकत्र मिळणार; लाभार्थी महिलांचा आकडा आला समोर, वाचा अपडेट

Maharashtra politics : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप; पटेल, तटकरे अन् भुजबळांना डच्चू? कार्यकारिणीच्या नव्या यादीने खळबळ

Zodiac Sign Lucky Colour: कोणत्या राशीसाठी कोणता रंग शुभ? तुमच्या आयुष्यात होईल भरभराट

Virar: विरारमध्ये सूर्या धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली, ३० ते ४० फूट उंच पाण्याचे फवारे उडाले; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT