गिरीश कांबळे | मुंबई
विधानपरिषदेतील ठाकरे गटाचं संख्याबळ कमी होत असल्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं विरोधी पक्षनेते पद धोक्यात येण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडे सध्या 7 आमदारांचं संख्याबळ असलं तरी त्यामधील 3 आमदारांचा कार्यकाळ जून आणि जुलैमध्ये संपत आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येऊ शकतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अशातच आमदार आमशा पाडवी यांच्या शिंदे गटात प्रवेशाने ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील संख्याबळ आणखी कमी होत आहे. ठाकरेंच्या आमदारांची संख्या सध्या 8 वर आहे, तर आमशा पाडवी यांच्या पक्षप्रवेशामुळे ही संख्या 7 वर येणार आहे. (latest politics news)
ठाकरे गटाचे सध्याचे 7 आमदार आणि त्यांचा संपण्याचा कार्यकाळ
सचिन अहिर - 7 जुलै 2028
उद्धव ठाकरे - 13 मे 2026
नरेंद्र दराडे - 21 जुन 2024
अंबादास दानवे - 21 ऑगस्ट 2025
अनिल परब - 27 जुलै 2024
विलास पोतनिस - 7 जुलै 2024
सुनील शिंदे - 1 जुलै 2028
काँग्रेस सध्याचे आमदार आणि त्यांचा संपण्याचा कार्यकाळ
जयंत आसगावकर – 6 डिसेंबर 2026
भाई जगताप – 7 जुलै 2028
सतेज पाटील – 1 जानेवारी 2028
वजाहत मिर्झा – 27 जुलै 2024
राजेश राठोड – 13 मे 2026
धीरज लिंगाडे – 7 फेब्रुवारी 2029
अभिजीत वंजारी – 6 डिसेंबर 2026
प्रज्ञा सातव – 27 जुलै 2024
शरद पवार गटाचे सध्याचे आमदार आणि त्यांचा संपण्याचा कार्यकाळ
शशिकांत शिंदे - 13 मे 2026
एकनाथ खडसे - 7 जुलै 2028
अरुण लाड - 6 डिसेंबर 2026
महाविकास आघाडीचे सध्याचं संख्याबळ
ठाकरे - 7
काँग्रेस - 8
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - 3
महाविकास आघाडीचं जुलै महिन्यानंतरचं संख्याबळ
ठाकरे गट - 4
काँग्रेस - 6
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट- 3
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.