Vaijnath Waghmare SaamTV
मुंबई/पुणे

Political News : शिंदे गटाचे प्रवक्ते वैजनाथ वाघमारेंची पक्षाला सोडचिट्ठी, पक्षप्रवेशावेळी सुषमा अंधारेंवर केलेले गंभीर आरोप

Political News : शिवसेना पक्षाकडून पक्षबांधणीत कुठचीच महत्त्वाची जबाबदारी दिली जात नसल्याने वैजनाथ वाघमारे नाराज होते.

सूरज सावंत

Mumbai News : शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अॅड. वैजनाथ वाघमारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्याकडे वाघमारे यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. अॅड. वैजनाथ वाघमारे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता. वैजनाथ वाघमारे हे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचे विभक्त पती आहेत.

शिवसेना पक्षाकडून पक्षबांधणीत कुठचीच महत्त्वाची जबाबदारी दिली जात नसल्याने वैजनाथ वाघमारे नाराज होते. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. वैजनाथ वाघमारे यांचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. वाघमारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पक्ष सचिवांकडून केला जात आहे.  (Latest News Update)

शिवसेनेत प्रवेश करताना वाघमारे यांनी सुषमा अंधारेवर जोरदार टीका केली होती. सुषमा अंधारेंना इतिहासाची पुस्तकं कुणी दिली? हा खरा प्रश्न आहे. आम्ही सोबत १५ वर्षे काम केले आहे. परंतु त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांनी पक्षप्रवेश करु नये, असं मला वाटत होतं. त्यांचा हा निर्णय मला पटला नाही. त्यामुळे आम्ही विभक्त झालो, असं असा आरोप वैजनाथ वाघमारे यांनी केला होता.  (Breaking Marathi News)

सुषमा अंधारेंविरोधात निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. माझा पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य असेल. उद्या पक्षाने सांगितलं निवडणूक लढा, तर सुषमा अंधारे असू दे किंवा इतर कोणीही मी निवडणूक लढेन, असंही वैजनाथ वाघमारे यांनी पक्षप्रवेशावेळी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coriander Water For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्या 'या' दाण्यांचे पाणी, पोटाची चरबी होईल झपाट्याने कमी

Wednesday Horoscope : दिवसभर खिसा रिकामा राहणार नाही; ५ राशींच्या लोकांच्या मनातील इच्छा होणार पूर्ण

Rahuri By-Election: राहुरी पोटनिवडणूक होणार चुरशीची; ठाकरेंचा हुकमी एक्का उतरला रिंगणात, पण...

David Warner: डेव्हिड वॉर्नरला अटक; क्रिकेट विश्वात खळबळ, नेमकं कारण काय?

Alarm clock history: जुन्या काळात अलार्म नसताना लोकं सकाळी कशी उठायची?

SCROLL FOR NEXT