Supriya Sule Saam Tv
मुंबई/पुणे

Supriya Sule : अजित पवार आणि राष्ट्रवादीतील घडामोडींवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया...

NCP Spit News : अजित पवारांना राष्ट्रवादीतील ४० आमदारांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे.

Prachee kulkarni

Political News : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार 35 आमदारांसोबत राजभवनावर दाखल झाले आहे. अजित पवार राष्ट्रवादीतील काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. अजित पवारांना राष्ट्रवादीतील 40 आमदारांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीतील या घडामोडींवर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुळे यांनी म्हटलं की, हा संपूर्ण निर्णय अजित पवार यांचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. सुप्रिया सुळेंची साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या होत असलेला शपथविधी शरद पवार यांच्या आशीर्वादाने होत असल्याची चर्चा होती, पण त्यावरही पडदा पडला आहे. (Latest Marathi News)

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचे ९ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अजित पवार यांच्यासहित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील राजभवनात दाखल झाले आहेत. अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार सरकारला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. (Political News)

अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीतील काही आमदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीला सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, अमोल कोल्हे यांच्यासह जवळपास 18 आमदार उपस्थित होते. मात्र या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गैरहजर होते अशी माहिती आहे.

या बैठकीतून सुप्रिया सुळे निघून गेल्या होत्या. त्यानंतर अजित पवार काही आमदारांना सोबत घेऊन थेट राजभवनात दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांच आक्रमक आंदोलन..

Dharmendra Pradhan: मोठी बातमी! शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार, ओम बिर्लांची घेतली भेट

EPFO : लग्न ठरलंय! पीएफचे पैसे कसे काढायचे? EPFO चा हा नियम आत्ताच वाचा

पावसाळ्यात कोणती सनस्क्रीन वापरायची?

Bone cancer symptoms: हाडं सतत दुखतायत म्हणून दुर्लक्ष करताय? डॉक्टरांनी सांगितली बोन कॅन्सरची सुरुवातीची चार महत्त्वाची लक्षणं

SCROLL FOR NEXT