Market Committee Election Results 2023  saam tv
मुंबई/पुणे

Political News : लोकसभेसाठी अनेक जागांची अदलाबदल होण्याची शक्यता; श्रीकांत शिंदेंना देखील हक्काचा मतदारसंघ सोडावा लागणार?

Political News : श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या मतदारसंघातून रवींद्र चव्हाण यांना उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

Political News : आगामी लोकसभेची निवडणूक भाजप आणि इतर पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सर्वच पक्षांना लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपली तयारी सुरु केला आहे. भाजप-शिवसेना युतीत अनेक जागांची अदलाबदल होऊ शकते. तर दुसरीकडे ठाकरे गटानेही कंबर कसली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग दोनदा खासदार असणारे श्रीकांत शिंदे ठाण्यातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या मतदारसंघातून रवींद्र चव्हाण यांना उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

ठाकरे गट देखील मुंबईतील लोकसभा निवडणुकीसाठी 6 पैकी 4 जागा लढण्यासाठी आग्रही आहे. यामध्ये उत्तर मुंबई (महाविकास आघाडी मित्र पक्ष), उत्तर पश्चिम (ठाकरे गट), उत्तर मध्य (महाविकास आघाडी मित्र पक्ष), दक्षिण मध्य मुंबई (ठाकरे गट (वंचित)), दक्षिण मुंबई (ठाकरे गट), ईशान्य मुंबई (ठाकरे गट) या जागांचा समावेश असू शकतो. (Latest News Update)

उत्तर पश्चिममध्ये गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांच नाव निश्चित झालं आहे. अमोल कीर्तीकरांसाठी कार्यकर्ते तयारीला सुद्धा लागले आहेत. त्यामुळे सुनील प्रभू यांचा विचार केला याची शक्यता फारच कमी आहे. (Political News)

दक्षिण मध्य मुंबईत सध्या खासदार राहुल शेवाळे शिंदे गटात आहेत. त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीला जागा दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे.

अमरावती मतदारसंघ

अमरावती लोकसभा निवडणुकीत अमरावतीची जागा काँग्रेस मागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडे असलेल्या अमरावती लोकसभेवर काँग्रेस व ठाकरे गटाचा दावा आहे. काँग्रेसकडून आमदार बळवंत वानखडे तर ठाकरे गटाकडून ज.मो.अभ्यंकर व दिनेश बुब यांच्या नावाची चर्चा सध्या आहे.

विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात माविआ आक्रमक असून विचारधारा सोडल्याने अल्पसंख्याक व दलित मतदारांची खासदार नवनीत राणा विरोधात नाराजी आहे.

अमरावतीत लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अमरावती मतदारसंघ काँग्रेस मागणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT