NCP Crisis Sharad Pawar vs Ajit Pawar  saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar-Sharad Pawar Meet : अजित पवार गटाला नेमके काय आशीर्वाद हवेत? सलग दोन दिवसांच्या भेटीचा अर्थ काय?

Political News : या भेटीतून काही राजकीय अर्थ निघतात, यावर एक नजर टाकूया.

प्रविण वाकचौरे

Mumbai News : अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार गटाचे आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. मात्र राष्ट्रवादी पक्षात या राजकीय घडामोडी घडत आहेत, तर त्याला काही अर्थ असू शकतो. शरद पवार आमचे नेते आहेत, त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे अजित पवार गटाने सांगितलं. मात्र या भेटीतून काही राजकीय अर्थ निघतात, यावर एक नजर टाकूया.

सहानुभुतीची लाट

अजित पवार यांनी बंडखोरी केली, त्यावेळी पक्षातील बहुतांश आमदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा केला जात होता. अजित पवारांनी बंडखोरीनंतर मोठी सभा घेत शरद पवारांवर वयाचा मुद्दा उपस्थित टीका केली होती. या टीकेला शरद पवारांना उत्तर देणं टाळलं होतं. तर पक्ष आणि पक्ष चिन्ह गेलं तरी न्यायालयीन लढाई न लढता लोकांमध्ये आम्ही जाऊ असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. (Latest Marathi News)

त्यानंतर शरद पवारांना लोकांचा मिळालेला पाठिंबा मोठा आहे. एकंदरीत ठाकरे गटाप्रमाणे सहानुभुतेच्या लाटेचा शरद पवार गटाला नक्की पाठींबा मिळू शकतो. मात्र आमचे मतभेद असले तरी मनभेद नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून होत आहे. ज्याचा फायदा सहानुभुतीची लाट थोपवण्यासाठी होऊ शकतो.

९ आमदाराचा अपात्रतेचा मुद्दा

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाचा शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीने कायदेशीर पावलं उचलत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे या ९ आमदारांना अपात्र करण्याची याचिका केली होती. त्यामुळे या ९ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याची चर्चा आहे. मात्र ही कारवाई टाळावी यासाठी शरद पवारांना गळ घातली जात असावी, असाही अंदाज आहे.

आमदारांचा संभ्रम दूर करणे

अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेल्यानंतर काही आमदारांनी थेट अजित पवारांना पाठिंबा दिला. तर काही आमदारांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र असे काही आमदार होते की त्यांनी भूमिका स्पष्ट केली नव्हती. किंवा ज्यांनी भूमिका स्पष्ट केली ते देखील अजून तळ्यात मळ्यात आहेत.

मात्र ज्या आमदारांच्या मनात किंतु-पंरतु आहेत त्यांच्याकडे योग्य मेसेज पोहोचण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून केला जात असावा. शरद पवार यांच्या भेटीतून एक प्रकारे संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून केला जात आहे. जेणेकरुन ज्या आमदारांना निर्णय घेणे कठीण जात आहे, त्यांना निर्णय घेणे सोपं जाईल, अशी खेळीही अजित पवार गटाकडून खेळली जात आहे, असं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT