Jayant Patil  SAAM TV
मुंबई/पुणे

Jayant Patil News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनुकरण करा; जयंत पाटलांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

Jayant Patil News: राष्ट्रवादी काँग्रेसची पुणे शहराची कार्यकारणी बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत पार पडली.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Jayant Patil News: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकांचा धडाका सुरु केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची पुणे शहराची कार्यकारणी बैठक आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत पार पडली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनुकरण करा, असा कानमंत्र जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 5-10 लोक रोज सकाळी एकत्र येतात आणि कवायत करतात. आपण रोज नाही पण किमान कार्यकर्त्यांनी प्रत्येक शनिवारी एकत्र यावे. पक्षाची प्रकृती चांगली होईल. पक्ष तंदुरुस्त होईल.

मी सांगतो शनिवार हा 'बजरंग बली'चा वार आहे. त्यामुळे या दिवशी चर्चा करा. आपला पक्ष हुकूमशाहीचा नाही लोकशाहीचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनुकरण करा, असा उपहासात्मक वक्तव्यही जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलं. (Breaking Marathi News)

विधानसभा निवडणुकीत भाजपला 60 जागाही मिळणार नाहीत

राज्यात आगामी निवडणुकामध्ये ध्रुववीकरण होणार नाही. कर्नाटकमध्ये एका पक्षाला लोकांनी निवडून दिलं आहे. पुण्यात रविंद्र धंगेकर निवडून आले, पण चिंचवडमध्ये जिंकता आलं नाही. आगामी निवडणुकीत भाजप ३५ टक्क्यांवर निवडून येणार नाही. विधानसभेत भाजप ६० जागांच्यावर जाणार नाही, असा दावाही जयंत पाटलांनी केला.  (Maharashtra Political News)

भाजप हा लोकप्रिय पक्ष नाही

भाजप हा लोकप्रिय पक्ष नाही हे लोकांना कळले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने असे पाऊले उचलली आहेत की हे सरकार आपले रक्षण करणारे नाही हे लोकांना कळून चुकलं आहे. देशातील ९ राज्यांतील सरकार पाडण्याचे काम भाजपने केले.

कर्नाटकात ज्यांनी काँग्रेस सोडली ते १६ लोक होते त्यातले १५ पराभूत झाले. महाराष्ट्रात ज्याने पक्ष सोडला त्यांना कडक शिक्षा जनतेकडून होईल.४० मधले आता एकपण निवडून येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महानगरपालिकेच्या वेळेस राष्ट्रवादी बरोबर युती करणं हा चुकीचा निर्णय; सपकाळ

Manoj Jarange Health : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

SCROLL FOR NEXT