Eknath Shinde vs Uddhav Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Shinde vs Thackeray : बैठक शिवसेनेच्या शिंदे गटाची, मात्र चर्चा उद्धव ठाकरेंची... बैठकीत नेमकं काय घडलं?

Political News : आता पूर्वीप्रमाणे सही घेण्यासाठी माझाकडे वेळ घ्यावा लागत नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

सूरज सावंत

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष वाढीसाठी कंबर कसली आहे. शिवसेना पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सोमवारच्या आमदार, खासदार व जिल्हाप्रमुखांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधल्याची माहिती समोर येत आहे.

साम टीव्हीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवलं. आम्ही बोगस काम करत नाही. एकदा ते बटन दाबा, मग दुसऱ्याच सोबत जा, हे आपल्याला जमत नाही, असं शिंदेंनी बैठकीत म्हटलं.

अडीच वर्षात राज्यातील सर्व प्रकल्प थांबले होते. युतीचं सरकार येताच सर्व स्पीड ब्रेकर दूर करत, प्रकल्प आम्ही मार्गी लावले. महाविकास आघाडीत महाराष्ट्र मागे पडला, युती सरकार येताच पून्हा 1 नंबरवर आणला, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. (Latest Marath News)

आम्ही कुठल्याही प्रकल्पात वाटाघाटी करत नाही. प्रकल्पातून रोजगार किती निर्माण होऊ शकतो याकडे आमचा कल असतो. एकाच वर्षात इतके निर्णय घेतले की विरोधकांना पोटदुखी सुरू झालेली आहे. त्यासाठी राज्यभर बाळासाहेबांच्या नावाने आपला दवाखानाही सुरू केला. आता मुंबई सुधरवणार, खड्डेमुक्त मुंबई करणार, पूर्वी प्रमाणे टेंडरमुक्त मुक्त मुंबई करणार, अशी ग्वाहीही एकनाथ शिंदेंनी दिली. (Political News)

मी खिशात दोन पेन ठेवतो

मी खिशात दोन पेन ठेवतो, एक संपला तर स्वाक्षरीसाठी दुसरा असावा. पूर्वीप्रमाणे सही घेण्यासाठी माझाकडे वेळ घ्यावा लागत नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

या पुढे सर्वांना भेटणार, सगळ्यांच्या गळ्याचे पट्टे काढणार. माझामुळे अनेकांच्या गळ्याचे व पाटीचे पट्टे आता दूर झाले आहेत. कोरोना काळात दुसऱ्या देशात काही झालं की इथे मास्क सक्ती चालू व्हायची. मुख्यमंत्रीही घरी बसायचे, अशी टीकाही त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कुणबी - मराठा म्हणून आरक्षण घेण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

Building Collapsed : मुंब्र्यात मध्यरात्री दुर्घटना, २५ वर्ष इमारतीचा सज्जा कोसळला, महिलेचा जागीच मृत्यू

GST Reforms: प्रत्येक घराघरात वापरणाऱ्या १५ वस्तू, १० दिवसांत होणार स्वस्त, सगळी यादी एका क्लिकवर

गृहमंत्र्यांचा राजीनामा, २१ जणांचा मृत्यू अन् सोशल मीडियावरील बंदी उठली, नेपाळमध्ये Gen-Z चं आंदोलन मागे

Lal Mathachi Bhaji Recipe : लाल माठाची भाजी आरोग्याला ठरेल फायदेशीर, नेहमी रहाल हेल्दी अन् फिट

SCROLL FOR NEXT