Kalyan News Saam Tv
मुंबई/पुणे

Ravindra Chavan : महायुतीत फोडाफोडीला ब्रेक? शिवसेना पदाधिकाऱ्याचा भाजप प्रवेश तूर्तास स्थगित

Kalyan Dombivli Political News : डोंबिवलीत सुरू असलेल्या शिंदे गट – भाजप तणावावर अखेर पडदा पडला आहे. भाजपकडून अभिजित थरवळ यांच्या प्रवेशास स्थगिती देण्यात आली आहे. अशी माहिती स्वतः रवींद्र चव्हाणांनी दिली आहे.

Alisha Khedekar

  • अभिजित थरवळ यांच्या प्रवेशामुळे वाद चिघळला होता

  • भाजपने प्रवेशाला तात्पुरती स्थगिती दिली

  • शिंदे-भाजप तणाव कमी होण्याची शक्यता

  • स्थानिक राजकारणात मोठा बदल पाहायला मिळू शकतो

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला फोडफोडीचा धुरळा अखेर थंडावण्याचे संकेत दिसत आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी अभिजित थरवळ यांचा भाजप प्रवेश हा मोठा राजकीय मुद्दा ठरत असतानाच, या प्रवेशास तूर्तास स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ही माहिती स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आली. या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली असून, पक्षांतील वाद निवळण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. काल एका कार्यक्रमा दरम्यान शिंदे व रवींद्र एकाच मंचावर दिसून आले होते. आणि दुसऱ्याच दिवशी थरवळ यांच्या प्रवेशाला स्थगित करण्यात आले आहे.

थरवळ यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याच्या चर्चेने शिवसेना पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यानंतर वातावरण तापले असताना, प्रवेश स्थगित करण्याच्या निर्णयामुळे दोन्ही पक्षांतील तणाव शमण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर उमटत आहे.

भाजपकडून आलेल्या या अधिकृत संकेतांनंतर सध्यातरी डोंबिवलीतील शिवसेना–भाजप वादावर पडदा पडल्याचे चित्र आहे. मात्र पुढील काही दिवसांत या प्रकरणाला कोणते राजकीय वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur News: कोल्हापुरात कृषी प्रदर्शनात गोंधळ; दोन तरुणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी|VIDEO

Maharashtra Live News Update: सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार

Indigestion problems: थंडीच्या दिवसात होतेय अपचनाची समस्या? स्वयंपाक घरात असलेला हा मसाला करेल त्रास दूर

ST Bus: यापुढे शाळांच्या सहलीसाठी फक्त 'लालपरी'च, खासगी बस वापल्यास होणार कारवाई; नवे नियम काय?

ठाकरेंना धक्का बसणार? महत्त्वाच्या शिलेदाराची सरनाईकांसोबत चर्चा, वाचा भेटीत दडलंय काय

SCROLL FOR NEXT