Varsha Gaikwad  Saam Tv
मुंबई/पुणे

Political Breaking News: मोठी बातमी! वर्षा गायकवाड काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष; भाई जगताप यांना हटवले

मोठी बातमी! वर्षा गायकवाड काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष; भाई जगताप यांना हटवले

Satish Kengar

Varsha Gaikwad News Update : माजी शालेय शिक्षण मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाई जगताप यांना पदावरून हटवण्यात आले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, मुंबई काँग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. मुंबई काँग्रेसमध्येही मोठा बदल झाला आहे. भाई जगताप यांना काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावरून हटवले असून, वर्षा गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी ही निवड केली आहे. तसं पत्रकच त्यांनी जाहीर केलं आहे. (Maharashtra Politics)

गुजरात आणि पद्दुचेरीमध्येही मोठे फेरबदल

काँग्रेसने गुजरात आणि पद्दुचेरीमध्येही मोठे बदल केले आहेत. गुजरातच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी खासदार शक्तिसिंह गोहिल यांची, तर पद्दुचेरीच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार व्ही. वैथीलिंगम यांची निवड केली आहे. (Latest Marathi News)

काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी मुंबई अध्यक्ष भाई जगताप, गुजरातचे जगदीश ठाकोर, पद्दुचेरीचे ए. व्ही. सुब्रमण्यम यांनी पदावर असताना दिलेल्या योगदानाचे कौतुकही केले आहे.

कोण आहेत वर्षा गायकवाड?

दिवंगत माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या सक्रिय सदस्य आहेत. 3 फेब्रुवारी 1975 रोजी त्यांचा जन्म झाला. 2004 च्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत त्यांनी सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले आणि धारावी मतदारसंघातून निवडून आल्या.

2009 मध्ये त्यांनी पुन्हा विजयाची पुनरावृत्ती केली आणि उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री म्हणून काम केलं. 2010 ते 2014 पर्यंत त्यांनी महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून काम केलं. पुढे त्यांनी मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणूनही काम केले. 2014 मध्येही त्या धारावी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्या होत्या. 2019 मध्ये निवडून आल्यानंतर त्या राज्याच्या पहिल्या महिला शिक्षण मंत्री झाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

SCROLL FOR NEXT