पोलीसांच्या मनोबलवृद्धीसाठी पोलीस प्रशिक्षण केंद्रे सुरु करावीत - उद्धव ठाकरे Saam Tv
मुंबई/पुणे

पोलिसांच्या मनोबलवृद्धीसाठी पोलीस प्रशिक्षण केंद्रे सुरु करावीत - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचे पोलीस दल हे देशातील सर्वोत्तम पोलीस दल असून ते जागतिक स्तरावर सर्वोत्तम ठरण्यासाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांची कार्यक्षमता वाढवण्यात यावी, त्या माध्यमातून त्यांचे मनोबल वाढवण्यात यावे असे आवाहन करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात विभागवार पोलीस प्रशिक्षण केंद्रे सुरु करावीत अशी सूचना आज केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - महाराष्ट्राचे Maharashtra पोलीस Police दल हे देशातील सर्वोत्तम पोलीस दल असून ते जागतिक स्तरावर सर्वोत्तम ठरण्यासाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांची कार्यक्षमता वाढवण्यात यावी, त्या माध्यमातून त्यांचे मनोबल वाढवण्यात यावे असे आवाहन करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी राज्यात विभागवार पोलीस प्रशिक्षण केंद्रे सुरु करावीत अशी सूचना आज केली. त्यांनी येत्या रविवारी राजर्षि शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने कोल्हापूर Kolhapur येथे  सारथीचे उपकेंद्र सुरु करण्यात येईल अशी माहितीही यावेळी दिली. Police training centers should be started to boost the morale of the police

हे देखील पहा -

साताऱ्याच्या मल्हारपेठ पोलीस ठाणे व पोलीस वसाहत इमारतीच्या ई भुमिपुजन कार्यक्रमाच्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. कार्यक्रमास  उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री(ग्रामीण) शंभुराज देसाई,  गृहराज्यमंत्री सतेज पाटील, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे पोलीस गृहनिर्माण विभागाचे पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर, सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी‍ विनय गौडा, सातारा पोलीस दलातील अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री यावेळी बोलतांना म्हणाले की, नागरिकांच्या घराचे आणि जीवाचे रक्षण पोलीस करतात पण त्यांच्याच घरांचे संरक्षण होणार नसेल तर त्याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होणे अत्यंत स्वाभाविक आहे, हे दुष्परिणाम टाळण्यासाठी उत्तम दर्जाच्या आणि आधुनिक रंगसंगतीच्या पोलीस वसाहती निर्माण होणे आवश्यक आहे.  पोलीसदलाच्या भावना आणि अडचणींशी मी सहमत आहे. त्यांच्या अपेक्षा प्रत्यक्षात उतरवणारे हे सरकार आहे.

पोलीस स्टेशन शेजारीच पोलीस वसाहत इमारत असणे गरजेचे असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, त्यामुळे पोलीसांच्या वेळेची आणि श्रमाची बचत होऊन कामाचा दर्जा उत्तम राहण्यास मदत होणार आहे. मल्हारपेठ पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गुन्हेगारांना जरब बसावी तर गोरगरीबांना आधार मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकांना पोलीस स्टेशनला येण्याची गरजच पडू नये इतकी इथली कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राहावी असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या बाळासाहेब देसाई आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांमधील ऋणानुबंधाचे आणि त्या दोघांमध्ये परस्परांविषयी असलेल्या आदराचे ही स्मरण केले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT