Pune Crime google
मुंबई/पुणे

Pune Crime: कलंक! हुक्का पार्लर चालकाकडून पोलीस उपनिरीक्षकच घेत होता हफ्ता; लाचखोरी प्रकरणाचा पर्दाफाश

Pune News: पुण्यातील वानवडी भागातील अवैध हुक्का पार्लर सुरू ठेवण्यास पोलिस उपनिरीक्षक विशाल पवार यांनी परवानगी दिली होती. या प्रकरणावर कारवाई करत त्याला निलंबित करण्यात आले आहे. पवारवर लाच घेण्याचा आरोप आहे.

Dhanshri Shintre

पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिस प्रशासन तणावाखाली आहे. या दरम्यान, एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. वानवडी भागातील एका हुक्का पार्लर चालकाकडून पोलीस उपनिरीक्षक हफ्ता घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संबंधित पोलिस उपनिरीक्षक विशाल पवार हा हुक्का पार्लर चालवणाऱ्यांकडून 20 हजार रुपयांचा हप्ता घेत होता.

या प्रकरणाची तपासणी केल्यानंतर, पुणे पोलिस प्रशासनाने विशाल पवारवर त्वरित कारवाई केली आणि त्याला निलंबित केले. हुक्का पार्लर चालकाला परवानगी देत असताना, तो आपला गुन्हेगारी धंदा चालवताना देखील पोलिस उपनिरीक्षकाची मदत घेत होता. पोलिस विभागाने हप्तेबाजीच्या या प्रकरणावर कडक कारवाई केली असून, सखोल तपास सुरू आहे.

पुण्यातील वानवडी परिसरात एका हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पुणे पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. हॉटेल चालकाचा मोबाईल तपासल्यानंतर वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार याच्याशी संबंधित असलेल्या संपर्काचे धागे समोर आले.

पोलिसांनी तपास केल्यावर समजलं की, हुक्का पार्लर चालवणारा हॉटेल चालक दरमहा 20 हजार रुपयांचा हप्ता पवारला देत होता. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिस प्रशासनाने त्वरित कारवाई करत विशाल पवार याला निलंबित केले आहे. हप्तेबाजीच्या या प्रकरणाने पोलिस दलावर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT