Palghar saam tv
मुंबई/पुणे

Palghar News : समुद्रात बुडणा-या युवकाचा जीव वाचवण्‍यात पोलिसांना यश

त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

रुपेश पाटील

Palghar News : समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास मनाई आदेश असताना देखील समुद्रात पोहण्यास गेलेल्या एका पर्यटकाला चांगलंच महागात पडलं. दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे या तरुणाला वाचवण्यात वाणगाव पोलिसांना यश आल आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समुद्र किनाऱ्यावर असलेल्या एका स्थानिक तरुणाने चित्रित केला. हा धक्कादायक व्हिडिओ सध्या समाज माध्यमात व्हायरल हाेत आहे. (Maharashtra News)

बोईसर (boisar) मधील टाटा हाऊसिंग येथे राहणारा फैजल आबादी सैफी हा 27 वर्षीय तरुण दुपारच्या सुमारास चिंचणी येथील समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी गेला होता. मात्र समुद्रातील पाण्याच्या लाटांचा वेग वाढल्याने हा तरुण अचानक पाण्यात बुडू लागला. ही बाब तिथे असलेल्या एका स्थानिकाच्या लक्षात आल्याने या स्थानिकाने लागलीच चिंचणी पोलीस दुरक्षत्र येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी भूषण संखे यांना फोनद्वारे संपर्क केला.

यानंतर पोलिसांनी चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या दोन तरुणांच्या मदतीने बुडत असलेल्या तरुणाला खवळलेल्या समुद्राची भीती न बाळगता बाहेर काढलं. यावेळी बुडत असलेल्या तरुणाच्या नाका तोंडात पाणी गेल्याने त्याला चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT