Avinash Jadhav MNS Saamtv
मुंबई/पुणे

Avinash Jadhav: मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर खंडणीचा गुन्हा; सराफा व्यापाऱ्याकडे ५ कोटी मागितल्याचा आरोप

MNS Avinash Jadhav News: मनसे नेते अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्यावर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

Satish Daud

MNS Avinash Jadhav Extortion case

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे नेते अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्यावर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सराफा शैलेश जैन (वय ५५) यांच्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, जैन यांनी वैभव ठक्करला झवेरी बाजार येथील आपल्या कार्यालयात हिशेबासाठी बोलावले होते. त्यावेळी अविनाश जाधव आणि त्यांचे सहकारी तिथे आले. जाधव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांसमोर जैन यांचा मुलगा सौमिल याला मारहाण केली.

इतकंच नाही, तर जैन यांच्याकडे ५ कोटी रुपयांची खंडणी देखील मागितली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी जाधव यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

दुसरीकडे, अविनाश जाधव यांनी या आरोपांचं खंडण केलं आहे. "एका वैभव नावाच्या व्यक्तीने मला कॉल करून मला व माझ्या पत्नीला डांबून ठेवले, असे सांगितले होते. मी त्याला पोलिस नियंत्रण कक्षात कॉल करण्यास सांगितले. त्यानंतर, मी मदतीसाठी पोलिसांसह तेथे गेलो", असं जाधव यांनी म्हटलं आहे.

आपल्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत कल्पना नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. अविनाश जाधव हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष आहेत. राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. जाधव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने मनसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

SCROLL FOR NEXT