Pune : बेकायदेशीर रेशनिंग धान्य साठ्यावरती पोलिसांचा छापा; 23 लाखांचा साठा जप्त दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

Pune : बेकायदेशीर रेशनिंग धान्य साठ्यावरती पोलिसांचा छापा; 23 लाखांचा साठा जप्त

पोलिसांनी 50 किलो वजनाच्या तांदळाच्या 680 गोणी आणि गव्हाच्या 640 गोणी तसेच एक शिलाई मशीन असा एकूण तेवीस लाख सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी-चिंचवड

मावळ : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) गुन्हे शाखेच्या दरोडा पथकाने रात्री सोमाटने फाटा येथील रुद्राक्ष चायनिज अँड रेस्टॉरंट गणपती मळा येथे छापा टाकून कारवाई करत बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ठेवलेला रेशनिंगच्या धान्याचा तेवीस लाख रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे (Crime Branch Robbery Squad) सहाय्यक पोलीस आयुक्त पद्ममाकर घनवट यांना मिळालेल्या माहिती नुसार सोमाटने फाटा येथील रुद्राक्ष चायनीज अँड रेस्टॉरंट गणपती मळा येथे बेकायदेशीरपणे रेशनिंगच्या (Ration) धान्याचा साठा करून ठेवलेला आहे.‌ ‌सदर माहितीच्या आधारे दरोडा विरोधी पथकाने छापा टाकून ही कारवाई केली आहे. स्वरूप पाटणकर असे आरोपी चे नाव आहे. शासकीय रेशनिंगचे गहू व तांदूळ अनधिकृतपणे विक्री करून नफा मिळवत असून त्यासाठी त्याने रेशनिंगच्या धान्याचा साठा करून ठेवला होता.

हे देखील पहा -

पोलिसांनी कारवाई करते वेळी पाटणकर यांच्या ताब्यातून प्रत्येकी पन्नास किलो वजनाच्या तांदळाच्या सहाशे ऐंशी गोणी आणि गव्हाच्या सहाशे चाळीस गोणी तसेच एक शिलाई मशीन धागा रीळ असा एकूण तेवीस लाख सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील पुढील कारवाईसाठी आरोपीला तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या (Talegaon Dabhade Police Station) ताब्यात देण्यात आले असून पुढील तावस तळेगाव पोलिस करीत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aishwarya Narkar: पन्नाशीतला हॉटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम

Hair Care : घरच्या घरी बनवा हे हेअर जेल, राठ केस होतील मऊ आणि चमकदार

Zp School : शाळेत सुविधांची वानवा; विद्यार्थिनीचे सरपंच- ग्रामसेवकाला पत्र, व्यथा मांडत सुधारण्याची मागणी

Pivali Sadi Song: संसाराच्या गाड्यातून वैयक्तिक आयुष्याला सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी; 'पिवळी साडी' गाण्याची प्रेक्षकांमध्ये क्रेझ

Gateway Of India: गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास आणि खास 10 मनोरंजक तथ्ये

SCROLL FOR NEXT