Devendra Fadnavis  saam tv
मुंबई/पुणे

Pune : पाकिस्तान जिंदाबाद बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा; देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

पीएफआयच्या कार्यकर्त्यांवर देशद्रोह, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

साम टिव्ही ब्युरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Devendra Fadnavis News : देश विघातक कृत्य केल्याच्या संशयावरून केंद्रीय तपास यंत्रणेने पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या कार्यालयांवर धाडसत्र राबविले. त्यानंतर पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी काल पुण्यात (Pune) कारवाई विरोधात घोषबाजी केली. याच पीएफआय कार्यकर्त्यांनी 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा दिल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं. आता या कार्यकर्त्यांवर देशद्रोह, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

पुण्यातील सेनापती बापट रोडवरील 'एमसीसीआयए'च्या कार्यलयात वार्षिक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. एमसीसीआयएच्या वार्षिक सभेच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पीएफआय कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीवर भाष्य केलं. 'महाराष्ट्रात जर कोणी पाकिस्तानचे नारे देईल, तर त्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर देशद्रोह, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणार. आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

पीएफआयच्या तपासावरील लक्ष हटवण्यासाठी काल घोषणाबाजी केली गेली, अशी चर्चा आहे. त्यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'पीएफआय'चा तपास गेली काही वर्ष सातत्याने पुरावे जमा करून करण्यात आला आहे. या संदर्भात वेगवेगळ्या राज्यांनी काही काम केलं आहे. मागच्या काळात मी गृहमंत्री असताना महाराष्ट्रात त्यांच्या हालचाली आम्ही ट्रॅक करत होते. मागच्या काळात केरळ सरकारने 'पीएफआय'वर बंदी टाकावी अशी मागणी केलेली आहे'.

फडणवीस पुढे म्हणाले, 'मला वाटतं की कोणीही केललं असलं तरी त्यांच्यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे लक्ष आहे. त्यांच्यावर राज्याच्या एजन्सीचं लक्ष आहे. ते विचलित होणार नाहीत. देशविरोधी कारवाया करतात, त्यांच्यावर कारवाई केली जाईल'.

'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

दरम्यान, पुण्यात 'पीएफआय'च्या आंदोलकांवर कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. कलम १५३ अंतर्गत सरकारी कामात अडथळ आणणे, १२४ देशाबद्दल अपशब्द बोलणे देशद्रोह गुन्हा आहे. कलम १०९ अंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य करणे, कलम १२० ब अतंर्गत कट रचणे असा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फक्त फिगर नाही, ब्रेस्ट हेल्थही महत्त्वाची! छातीचे स्नायू बळकट करण्यासाठी महिलांनी दररोज करा ही योगासने

Shocking : नाशिकनंतर नागपूर हादरले! महिलेचं जबरदस्ती धर्मांतर करण्याचा प्रयत्न; नकार देताच विनयभंग अन् मारहाण, ६ जणांवर गुन्हा

Maharashtra News Live Update: पुण्यातील खराडी भागात आगीची घटना

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

SCROLL FOR NEXT