पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या बदल्यांचे आदेश
एसीपी पदावरील पदोन्नतीनंतर रिक्त झालेल्या जागांवर नवीन नियुक्त्या
एका दिवसापूर्वीच नवी मुंबईत पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सोमवारी रात्री दिलेत. (Pimpri-chinchwad Police Reshuffle: Six Inspectors Transferred, New Postings Announced)
शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांची सहायक पोलीस आयुक्त पदावर बढती देत त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेत कार्यरत असलेले अरविंद पवार यांच्याकडे बावधन तर रुपाली बोबडे यांच्याकडे पिंपरी पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आलीय.
चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांची वाकड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आलीय. त्यांच्या जागी चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांची नियुक्ती करण्यात आलीय. तर रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्याकडे दिघी पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे यांची नियुक्ती करण्यात आलीय.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानंतर एकूण १० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आदेशानुसार सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी देविदास प्रभाकर कठाळे यांची रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक विजय सुर्वे यांची सानपाडा पोलीस ठाण्यात बदली झालीय.
रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील आनंदा वाघमारे यांची एनआरआय पोलीस ठाण्यात, तसेच खारघर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली राहुल पाटील यांची उरण पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.