Pune: कोरोना नियम न पाळणाऱ्या 4 मोठ्या हॉटेलवर पोलिसांची कारवाई Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: कोरोना नियम न पाळणाऱ्या 4 मोठ्या हॉटेलवर पोलिसांची कारवाई

पुण्यात मोठ्या- मोठ्या हॉटेल्समध्ये सुरू असलेल्या पार्टीमध्ये सर्रासपणे कोविड नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

पुणे : पुण्यासह संपूर्ण राज्यात कोरोनाने चांगलेच थैमान (Corona) दिवसेंदिवस घालत आहे. पुण्यात कोरोना बाधितांची वाढती रुग्णसंख्या बघता कोरोनाची तिसरी लाट पुण्यामध्ये धडकली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, असे असताना देखील पुण्यात (Pune) मोठ्या- मोठ्या हॉटेल्समध्ये (hotels) सुरू असलेल्या पार्टीमध्ये सर्रासपणे कोविड नियमांचे उल्लंघन (Covid) होत असल्याचे दिसून येत आहे. याची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी (police) ४ मोठ्या हॉटेल्सवर धडक कारवाई केली आहे.

पुण्यामधील मुंढवा परिसरात सुरू असलेल्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या पार्ट्यांमध्ये जाऊन पोलिसांनी कारवाई केली आहे. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करुन सुरू असलेल्या धांगड- धिंगाला पोलिसांनी रोखले आणि धडक कारवाई (Action) केली आहे. पोलिसांनी हॉटेल मधील साऊंड सिस्टम देखील बंद केली आणि कारवाई केली आहे.

हे देखील पहा-

कोविड नियमांचे पालन करण्याच्या विषयी हॉटेल्स मालकांना याअगोदर देखील सूचना देण्यात आले होते. हॉटेल मालकांची बैठक घेऊन देखील कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच हॉटेल मालकाला सतत पोलिसांनी नोटिसा (Notice) दिले होते. मात्र, तरी देखील हॉटेल प्रशासनाकडून (administration) याकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर कारवाई करण्यात आली आहे. मुंढवा पोलिसांच्या पथकाने कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४ मोठ्या हॉटेल्सवर कारवाई केली आहे.

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यामध्ये बुधवारी १८०० नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मागील काही दिवसामध्ये ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ९ दिवसाअगोदर दरदिवसाला ८० ते १०० रुग्ण सापडत होते. मात्र, आता हा आकडा थेट १८०० येऊन पोहोचला आहे. यामुळे पुण्यात देखील कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. पोलीस सह- आयुक्त, पुणे शहर यांनी वाढते कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर पुणे शहरातील नागरिकांना विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विषारी कफ सिरपमुळे नागपूरमध्ये आणखी एका बाळाचा मृत्यू

Maharashtra Election : निवडणुकीचे पडघम; नगरपालिका, नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

Lucky Zodiac Signs: पौर्णिमा तिथीच्या पवित्र योगात या राशी चमकणार! जाणून घ्या आजचं सविस्तर पंचांग आणि शुभ मुहूर्त

Budh Gochar 2025: राहूच्या नक्षत्रात आज होणार बुध ग्रहाचं नक्षत्र गोचर; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

SCROLL FOR NEXT