advocate shivshankar shinde
advocate shivshankar shinde saam tv
मुंबई/पुणे

Crime News : विवाहबाह्य संबंध ठेवला अन् उच्च न्यायालयातील वकिल जीवाला मुकला; तिघे अटकेत

गोपाल मोटघरे

Pimpri Crime News : पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरातील शिवशंकर दत्तात्रय शिंदे (advocate shivshankar shinde) या वकिलाचा अपहरण करून खून केल्या प्रकरणी पाेलिसांनी तिघांना अटक केली आहे. 31 डिसेंबरला ही घटना घडली हाेती. शिंदे हे उच्च न्यायालयात देखील कार्यरत असायचे. (Breaking Marathi News)

पाेलिसांनी (police) दिलेल्या माहितीनूसार 31 डिसेंबरला काही अज्ञातांनी शिवशंकर शिंदे यांचा खून केला हाेता. पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) पोलिसांच्या गुंडाविरोधी पोलिस पथकाने या घटनेचा तपास करुन तिघांना जेरबंद केले आहे. शिवशंकर शिंदे यांचा खून विवाहबाह्य अनैतिक संबंधांच्या संशयावरून करण्यात आल्याचं तपासात उघडकीस आल आहे.

या प्रकरणी राजेश्वर गणपत जाधव, सतीश माणिकराव इंगळे आणि बालाजी मारुती एलनवर या तिघा संशयितांना गुंडाविरोधी पोलिस पथकाने अटक केली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार यातील मुख्य संशयित आरोपी राजेश्वर गणपत जाधव आणि त्याची पत्नी स्वाती राजेश्वर जाधव यांचे घटस्फोटाचे प्रकरण शिवशंकर दत्तात्रय शिंदे हे वकील पाहत होते.

शिवशंकर दत्तात्रय शिंदे यांच्याकडे जाधव दाम्पत्याच घटस्फोटाचे प्रकरण सुरू असतानाच, स्वाती आणि शिवशंकर यांच्यात विवाहबाह्य अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय राजेश्वर यास आला. त्यातूनच त्यांनी शिवशंकर यांच्या काळेवाडी येथील ऑफिसमधून अपहरण करून तेलंगणा राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यातील चिन्नमा कोरी मंदिराजवळ नेवून मृतदेह जाळून पुरावा नष्ट केला.

ही सर्व बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. या अपहरण आणि खून प्रकरणात तेलंगणा राज्यातील मदनुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलीस स्टेशनला वर्ग झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कांदिवलीत निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई; कारमधील १२ लाखांची रोकड जप्त

Pet Care in Summer: उन्हाळ्यात तुमच्या पाळीव प्राण्यांना 'या' पद्धतीनं ठेवा हायड्रेटेड

Sanju Samson Statement: इथंच राजस्थान रॉयल्सकडून चूक झाली; संजू सॅमसनने सांगितलं पराभवाचं कारण

कोल्हापूर : गाेव्याला निघालेल्या खासगी बसनं महिलेस चिरडलं, घटनास्थळी उसळली मोठी गर्दी

Vladimir Putin : पुतीन बनले पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष; शपथ घेताच पाश्चिमात्य देश आणि युद्धावर केलं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT