Pandharpur News : पंढरपुरात संध्याकाळी ६ ते ८ मोबाइल-टीव्ही बंद; हा निर्णय घेण्यामागचं कारण काय? (व्हिडिओ पाहा)

या निर्णयाचा ग्रामस्थांनी स्वागत केले.
grampanchayat, mobile, tv
grampanchayat, mobile, tvsaam tv
Published On

Pandharpur News : टीव्ही आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यावर व शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला आहे. यावर उपाय म्हणून सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत गावातील सर्व टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय पंढरपूर तालुक्यातील देगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे.

या निर्णयाची माहिती ग्रामपंचायतीच्या शिपायाने गावातून दवंडी पेटवून दिली आहे. या दवंडीचा व्हीडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा आगदी तोंडावर आल्या आहेत. मुलांचे लक्ष अभ्यासात लागावे यासाठी गावातील प्रत्येक घरातील टीव्ही,मोबाईल दररोज दोन तास बंद ठेवण्याचा निर्णय़ येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

या निर्णयाची माहिती ग्रामपंचायतीच्या (grampanchayat) शिपाया मार्फत गावातून दररोज दवंडी देवून केली जात आहे. या उपर गावातील कोणी दिलेल्या वेळेत टीव्ही अथवा मोबाईलचा वापर करताना आढळून आल्यास त्या कुटुंबाला एक हजार रुपये दंड करण्याचाही निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. शाळेतील मुलांच्या अभ्यासासाठी असा निर्णय घेणारी देगाव ग्रामपंचायत सोलापूर (solapur) जिल्ह्यात एकमेव ठरली आहे.

Edited By : Siddharth Latkar

grampanchayat, mobile, tv
Chhatrapati Sambhaji Maharaj : मी ब्राह्मणांबद्दल बोलत नाही पण..., : छगन भुजबळ
grampanchayat, mobile, tv
Maharashtra News : चर्चा तर हाेणारच !कर्नाटकात जाताच महाराष्ट्रातील नेत्याचे घटलं वजन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com