Badlapur Crime News saam tv
मुंबई/पुणे

Badlapur Crime News: बदलापूर हादरले! डॉक्टरकडून २५ वर्षीय गतीमंद तरुणीवर अत्याचार

Badlapur Crime News: बदलापुरातील एका क्लिनिकमध्ये डॉक्टरकडून २५ वर्षीय गतीमंद तरुणीवर अत्याचाराची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Badlapur News: बदलापुरात धक्कादायक घटना घडली आहे. बदलापुरातील एका क्लिनिकमध्ये डॉक्टरकडून २५ वर्षीय गतीमंद तरुणीवर अत्याचाराची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टरच्या मुसक्या आवळल्या आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गतीमंद तरुणीच्या आईने तिला किराणा दुकानातून मसाले आणण्यासाठी पाठविले होते. या तरुणीला परिसराची योग्य अशी माहिती होती. त्यामुळे आईने तिला पाठवलं होतं. मसाला विक्रेता दुकानदार तरुणीला चांगल्याप्रकारे ओळखतो. यावेळी याच परिसरातील डॉक्टरने तिला एकटी पाहून क्लिनिकमध्ये बोलावलं. त्यानंतर डॉक्टरने तिच्यावर क्लिनिकमध्येच अत्याचार केला.

तरुणी पंधरा ते वीस मिनिटे झाले तरी घरी न आल्यामुळे घरच्यांची चिंता वाढली. तिची बहीण आणि आई तिला शोधण्यासाठी घराबाहेर पडले. त्यांनी दुकानदाराला विचारलं, त्याने ती दुकानातून कधीच गेली असल्याचं सांगितलं. त्यानंतर या दोघींना तिची चप्पल एका क्लिनिकच्या बाहेर दिसली. त्यानंतर दोघांनी क्लिनिकचा दरवाजा उघडला. त्या त्यावेळी गतीमंद तरुणी जोरजोरात रडू लागली. त्यानंतर तरुणीच्या संतापलेल्या कुटुंबाने बदलापूर पश्चिम येथील पोलीस स्टेशन गाठलं.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठलं. त्यांनी डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याच्या मुसक्या आवळल्याआहेत. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहे.

मुंबईत २० वर्षीय तरुणीवर अत्याचार

दरम्यान, मुंबईत रिक्षा चालकाने २० वर्षीय तरुणीवर आरे कॉलनीच्या जंगलात अत्याचार केल्याची घटना घडली होती. अत्याचार केल्यानंतर रिक्षा चालकाने तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ही घटना सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांनी २४ वर्षीय रिक्षा चालकास अटक केली आहे. रिक्षा चालक हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. रिक्षा चालकाने तरुणीला गोरेगावमधून बळजबरीने आरे येथील जंगलात घेऊन गेला. तिथे घेऊन गेल्यानंतर अत्याचार केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FDAची मोठी कारवाई; ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात १० टन पनीर, खवा जप्त

Weather Update: उन्हाच्या तडाख्यात 9 राज्यात पाऊस घालणार धुमाकूळ, कोणत्या राज्यांसाठी हवामान विभागानं दिला अलर्ट?

Gokul Election: निकाल जाहीर होताच महायुतीला दाखवला कोल्हापुरी हिसका; मुश्रीफ,नरकेंचं नाव घेत सतेज पाटील काय म्हणाले?

साठीच्या शिवसेनेला GEN Zचा चेहरा, आदित्य ठाकरे शिवसेनेचे नवे कार्याध्यक्ष?

Gokul Election: सतेज पाटलांचा नादखुळा; महायुतीच्या चार पहेलवानांना घोबीपछाड

SCROLL FOR NEXT