PMRDAचा अजब कारभार! बनेश्वर मंदिरा जवळच कचरा आणि सांडपाणी प्रकल्प Saam TV
मुंबई/पुणे

PMRDAचा अजब कारभार! बनेश्वर मंदिरा जवळच कचरा आणि सांडपाणी प्रकल्प

विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भकास केला जात आहे. पुणे PMRDA ने बागायत शेती जमिनीतच सांडपाणी कचरा प्रकल्प टाकला आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे: कधी पावसाचे संकट, कधी सुपीक जमिनीतून जाणारा रिंग रोड, तर कधी सुपीक जमिनीवर विकासाच्या नावाखाली टाकलेलं सांडपाणी आणि कचरा प्रकल्प आरक्षणाला आता पुणे जिल्ह्यातील शेतकरी पूर्णतः वैतागला आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भकास केला जात आहे. पुणे PMRDA ने बागायत शेती जमिनीतच सांडपाणी कचरा प्रकल्प टाकला आहे.

पुणे शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर नसरापूर गाव आहे. पूर्ण परिसर सुपीक जमीन आणि बागायती आहे. याच परिसरात प्राचीन असं बनेश्वर मंदिर आहे आणि वन विभागाचे तीन एकर मधील बनेश्वर उद्यानाला आता नजर लागली आहे. विकास कामाची पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात बागायती क्षेत्र मध्येच सांडपाणी आणि कचरा प्रकल्प उभा केला जाणार आहे. नसरापूर पीएमआरडीएच्या प्रसिध्द झालेल्या विकास आराखड्यात नसरापूर येथील प्रसिध्द प्राचिन बनेश्वर शिवमंदिरापासुन अवघ्या 200 मिटर अंतरावर पर्यटन झोनला लागुनच कचरा डेपो व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित केला गेला असुन याला बनेश्वर देवस्थान ट्रस्टने जोरदार विरोध केला आहे. प्रकल्प न हटवल्यास पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाविकांसह प्रखर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नसरापुर परिसरामधून रिंग रोड गेलेला आहे. या रिंग रोड मध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यामुळे आधीच हवालदिल असलेला शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. या भागात बागायती शेती मोठ्या प्रमाणावर आहे. जर या ठिकाणी कचरा प्रकल्प झाला तर या सर्व जमिनी नापिक होतील आणि परिसरात घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळेल हा डीपी तयार करताना प्रत्यक्ष पहाणी केली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

बनेश्वर मंदिर हे पवित्रस्थान असून लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. मंदिर रचनाकारांनी या मंदिरात शिवलिंगा खालून तसेच मंदिर परिसरातील कुंड व मुख्यमंदिराला लागून असलेल्या दगडी पाटातुन नैसर्गिकरित्या पाणी प्रवाहीत केलेले आहे. हे या जागृत मंदिराचे वैशिष्ट आहे. मंदिरा जवळूनच शिवगंगा नदी वाहते. मोठे वनउद्यान आहे. मात्र पुणे महानगर विकास आराखड्यात या मंदिर परीसराला लागून वरच्या बाजूस कचरा डेपो व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित केले आहेत.

यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरणार असून तेथून मंदिरा खालच्या बाजूस असल्याने तेथील दुषित पाणी मंदिरात येणार आहे. व मंदिराचे पावित्र्य या धोक्यात आले आहे. या चुकीच्या प्रकल्पांबद्दल भाविक व पर्यंटकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली असून यास आम्ही सर्व प्रकारे विरोध करणार असून प्रसंगी आंदोलन देखिल केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. आबा फडतरे यांचे कृषी पर्यटन केंद्र असून यांची वीस एकर जमीन इथे आहे. जर कचरा प्रकल्प झाला तर आम्ही काय करायचं असा प्रश्न त्यांना पडला आहे.

शिवगंगा नदी किनारी मंदिर आहे. नदी ज्या बाजुने वाहत येते त्याच्या वरच्या बाजुला कोणतेही प्रदुषण होणारे प्रकल्प असू नयेत असा नियम असताना कोणत्याही प्रकारे वस्तुस्थितीची पाहणी न करता मंदिराच्या वरच्या बाजूस नदी किनारी हे प्रकल्प प्रस्तावित आहेत. या बाबत आम्ही योग्य ती हरकत दिली आहे.

मात्र त्यावर योग्य निर्णय न झाल्यास आम्हाला भाविकांसह रस्त्यावर उतरावे लागेल. परिसराचा कोणताही अभ्यास न करता हे प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. बनेश्वर परीसर पर्यंटन क्षेत्र जाहीर केला आहे. येथील वनउद्यान, शिवगंगा नदी व त्यावरील धबधबा पाहण्यासाठी हजारो पर्यटक येतात जर परिसराला लागूनच कचरा डेपो झाला, तर पुर्ण परिसरात दुर्गंधी होणार आहे. तसेच संपुर्ण नदी प्रदुषित होणार आहे. नसरापूर सह अनेक गावच्या पाणी योजना या नदीवर आहेत. त्या देखिल बाधित होणार आहेत, त्यासाठी या प्रस्तावित प्रकल्पात बदल होणे गरजेचे आहे. अन्यथा आंदोलन उभा करण्याचा इशारा दिला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT