RR vs SRH: दोन्ही संघात 'या' मोठ्या बदलाची शक्यता; RRसाठी सामना महत्त्वाचा

आयपीएल 2021 (IPL 2021) चा दुसरा टप्पा अतिशय रोमांचक स्थितीत पोहोचला आहे.
RR vs SRH: दोन्ही संघात 'या' मोठ्या बदलाची शक्यता; RRसाठी सामना महत्त्वाचा
RR vs SRH: दोन्ही संघात 'या' मोठ्या बदलाची शक्यता; RRसाठी सामना महत्त्वाचाTwitter/ @IPL

IPL 2021: आयपीएल 2021 (IPL 2021) चा दुसरा टप्पा अतिशय रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. मुंबई इंडियन्ससारखा (Mumbai Indians) मजबूत संघ 7 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये आज एक अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. आज राजस्थान रॉयल्स (RR) संघाचा सामना सनरायझर्स हैदराबादशी (SRH) होणार आहे. एकीकडे, सनरायझर्स हैदराबादकडे गमावण्यासारखे काही नाही, दुसरीकडे, राजस्थानसाठी हा करो किंवा मरो चा सामना असणार आहे. प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना कोणत्याही किंमतीत हा सामना जिंकावा लागणार आहे.

RR vs SRH: दोन्ही संघात 'या' मोठ्या बदलाची शक्यता; RRसाठी सामना महत्त्वाचा
दरवर्षी खरीप संकटात; पिके पेरावे तरी कोणते?

वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाईल का?

ऑस्ट्रेलियाचा महान सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आयपीएलच्या या मोसमात सपशेल फेल ठरला आहे. पहिल्या टप्प्यातही त्याची बॅट शांत होती. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. अशा स्थितीत त्याचा संघ त्याला आजच्या सामन्यातून वगळण्याती शक्यता आहे. त्याच्या जागी जेसन रॉयला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते. हैदराबाद संघासोबत एक मोठी समस्या अशी आहे की त्यांचे बरेच खेळाडू कोरोनामुळे सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. त्यामुळे ते फारसे बदलू शकत नाहीत.

RR vs SRH: दोन्ही संघात 'या' मोठ्या बदलाची शक्यता; RRसाठी सामना महत्त्वाचा
सलग २६ विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव; चक दे इंडिया!

राजस्थान रियान परागला अधिक संधी देईल का?

राजस्थान रॉयल्ससाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. प्ले-ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी संघाला आजचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. अशा स्थितीत संघ आजच्या सामन्यात काही मोठे बदलही करू शकतो. फेज 2 मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये संघाचा युवा अष्टपैलू रियान परागची कामगिरी विशेष राहिली नाही. तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये फ्लॉप ठरला आहे. अशा परिस्थितीत त्याला आज संघातून वगळले जाऊ शकते. त्याचबरोबर एविन लुईस, डेव्हिड मिलर देखील संघात परतू शकतात.

राजस्थान रॉयल्स संभाव्य संघ-

संजू सॅमसन (C/WK), एविन लुईस, यशस्वी जैस्वाल, डेव्हिड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन, राहुल तेवातीया, महिपाल लामरोल, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी, मुस्तफिझूर रहमान, चेतन साकारिया.

सनरायझर्स हैदराबाद संभाव्य संघ-

केन विल्यमसन (कर्णधार), रिद्धीमान साहा (wk), जेसन रॉय, मनीष पांडे, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, जगदीश सुचित, संदीप शर्मा, खलील अहमद.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com