Mumbai-Pune Expressway Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident: PMPML चे अध्यक्ष आव्हाड यांच्या कारला भीषण अपघात, मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर घडली घटना

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघाताची घटना घडली. पीएमपीएमएलचे अध्यक्ष महेश आव्हाड यांच्या कारला अपघात झाला. या अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी झालेत.

Priya More

Summary -

  • पीएमपीएमएल अध्यक्ष महेश आव्हाड यांच्या कारला अपघात

  • मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना

  • लोणावळ्याजवळ मिनी व्हॅनने अचानक यू-टर्न घेतल्याने घडली घटना

  • अपघातामध्ये चालक आणि बॉडीगार्ड गंभीर जखमी

सागर आव्हाड, पुणे

पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांच्या कारला भीषण अपघात झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ही भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवरून पुण्याच्या दिशेला निघालेले पीएमपीएमएलचे अध्यक्ष महेश आव्हाड यांच्या कारला लोणावळ्याजवळ अपघात झाला. मळवलीजवळ एका मिनी व्हॅनच्या बेशिस्त चालकाने महामार्गावर यू टर्न घेतला. त्यामुळे आव्हाड यांच्या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि दोन्ही वाहनांची धडक झाली. या अपघातामध्ये आव्हाड यांचा बॉडीगार्ड आणि चालक गंभीर जखमी झाला. सुदैवाने या अपघातामध्ये जिवीतहानी झाली नाही.

या अपघातामध्ये महेश आव्हाड यांना मुक्का मार लागला. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या आव्हाड यांचे बॉडीगार्ड आणि चालक यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नशीब बलवतर म्हणून वाचलो अशी प्रतिक्रिया महेश आव्हाड यांनी दिली. आव्हाड यांच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये महेश आव्हाड यांच्या कारच्या पुढील भागाचा चुराडा झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT