PMP, PMP's Bus Day News, Pune News Updates SaamTvNews
मुंबई/पुणे

पीएमपीचा आज बस डे; महिलांना दिवसभर मोफत प्रवासाची संधी

बस डे निमित्ताने पुण्यात आठ दिवस विविध उपक्रमांच आयोजन

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे - सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणाऱ्या पीएमपीचा (PMP) आज बस डे आहे. त्यामुळे आज 5 मार्गांवर लेनद्वारे बस सेवा पुरविण्यात येणार आहे. वाहतूकीसाठी आज 1800 बसेस रस्त्यावर उतरवल्या जाणार आहेत. तसेच महिलांना आज दिवसभर मोफत प्रवास करता येणार आहे. तर आज बस (Bus) डे निमित्त किमान तिकीट दर हा 5 रुपये असणार आहे. 250 जादा बसेस रस्त्यावर धावणार आहेत. बस डे निमित्ताने पुण्यात (Pune) आठ दिवस विविध उपक्रमांच आयोजन देखील करण्यात आले आहे. (PMP's Bus Day News)

हे देखील पहा -

उद्या पीएमपीचा वर्धापनदिन आहे. त्यामुळे आज पीएमपीकडून बस डे साजरा करण्यात येतो. बस डेच्या या उपक्रमासाठी वाहतूक पोलीस, स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक यांच्याकडून पीएमपीला सहकार्य मिळत आहे. या अनोख्या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही पीएमपी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पीएमपी आज एक लकी ड्रॉ काढणार आहे. प्रथम विजेत्याला पीएमपी 1 वर्षाचा पास देणार आहे. तर दुसऱ्या विजेत्याला 6 महिने आणि तिसऱ्या विजेत्याला ज्यात 14 जण असतील, त्यांना तीन महिन्याचा मोफत प्रवास करता येणार आहे. या लकी ड्रॉमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील पीएमपी प्रशासनाने केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT